`राणे प्रतिष्ठान` म्हणते आम्ही ट्रक जाळणार; पोलिसांनी दिली नोटीस! - Rane Pratishthan Office bearers warns to Burn Trucks | Politics Marathi News - Sarkarnama

`राणे प्रतिष्ठान` म्हणते आम्ही ट्रक जाळणार; पोलिसांनी दिली नोटीस!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

अपघात झाल्यास कायदा गुंडाळून ठेवत पोलिसांना आव्हान देत ट्रक पेटवून देण्याचा हिसात्मक इशारा देणारे `राणे प्रतिष्ठान`चे प्रसाद जमखिंडीकर यांनी आज सोशल मिडीयावर दिला होता. आधीच या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असतांना हा इशारा दिल्याने खळबळ उडाली आही. पोलिसांनी यासंदर्भात श्री. जमखिंडीकर यांना  नोटीस बजावली आहे.

नाशिक रोड : परिसरात अपघात झाल्यास कायदा गुंडाळून ठेवत ट्रक पेटवून देण्याचा हिसात्मक इशारा देणारे `राणे प्रतिष्ठान`चे प्रसाद जमखिंडीकर यांनी आज सोशल मिडीयावर दिला होता. आधीच या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असतांना हा इशारा दिल्याने खळबळ उडाली आही. पोलिसांनी यासंदर्भात श्री. जमखिंडीकर यांना  नोटीस बजावली आहे.

गेल्या तीन महिन्यात नाशिक रोड परिसरात अवजड वाहनांमुळे अनेक लोकांचे प्राण गमावले गेले नाशिक रोड येथे अवजड वाहनांना परवानगी नसतानाच जेलरोड येथे कायदा-सुव्यवस्था मोडून अवजड वाहने मार्गक्रमण करीत आहे यापुढे अवजड वाहनांमुळे अपघात झाल्यास अवजड वाहने जाळून टाकण्याचा इशारा राणे प्रतिष्ठान'च्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला आहे नासिक रोड परिसरात हा मुद्दा सध्या मोठ्या चवीने चर्चिला जात आहे।

तीन महिन्यात नाशिक रोड परिसरात चौदा लोकांचे प्राण गेले याआधी जेल रोडला अवजड वाहनांमुळे विविध अपघातांत काहींना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या भागातून अवजड वाहतूक बंद करावी. तसी नियम असताना पोलिस त्याकडे हेतूपुर्वक कानाडोळा करतात. त्यामुळे सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी या मागणीसाठी आंदोलने केली. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यावर पर्याय म्हणून राणे प्रतिष्ठाणचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रसाद जमखिंडीकर यांनी आज भविष्यात अवजड वाहनांना जेलरोड ला प्रवेश देऊ नये अवजड वाहनांमुळे अपघात झाल्यास अवजड वाहने जाळून टाकण्यात येतील, असा इशारा देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे खळबळ उडाली.  त्यावर मुन्ना शेख, आकाश जगताप, दिनेश खरे, देवा साळवे, मयूर जानराव, अजय पवार, आकाश गाणी आदींची नावे होती. 

ही माहिती मिळताच आधीच वरिष्ठांची मर्जी खप्पा असल्याने अलर्ट असलेल्या पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी संबंधीतांना नोटीस बजावली. भविष्यात असे काही घडल्यास त्याला तुम्हाला जबाबदार मानन्यात येईल, अशी नोटीस बजावली. त्यामुळे आज दिवसभर या भागात त्याचीच चर्चा होती. 
....
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख