दसरा मेळावा शंभर लोकांत करा; अन्यथा शिवसेनेवर कारवाई!  - Ramdas athawale warns Shivsena on Dashhara melava | Politics Marathi News - Sarkarnama

दसरा मेळावा शंभर लोकांत करा; अन्यथा शिवसेनेवर कारवाई! 

संपत देवगिरे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सगळ्यांना विश्‍वासात घेऊन काम करावे. नवरात्र सुरु झाले आहे, त्यामुळे लवकरच शिवसेना आपला दसरा मेळावा घेईल. शिवसेनेने आपला दसरा मेळावा शंभर जणांच्या उपस्थितीतच करावा. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मेळावा करावा,

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सगळ्यांना विश्‍वासात घेऊन काम करावे. नवरात्र सुरु झाले आहे, त्यामुळे लवकरच शिवसेना आपला दसरा मेळावा घेईल. शिवसेनेने आपला दसरा मेळावा शंभर जणांच्या उपस्थितीतच करावा. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मेळावा करावा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई होईल, हे लक्षात ठावेवे, असे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. 

श्री. आठवले एका कार्यक्रमासाठी आज नाशिकला आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यामुळे ते राज्यभर दौरा करतात. त्यांनी आपल्या दौऱ्यानंतर राज्य सरकारला माहिीत द्यावी. शेतकऱ्यांसाठी काय मदत करायची गरज आहे, हे सरकारला सांगावे. नुकसान झालेल्या शेकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने प्रसंगी कर्ज काढावे, मात्र शेतकऱ्यांना मदत करावी. 

कंगनाच्या भूमिकेशी सहमत नाही

मध्यंतरी कंगना रानावत यांनी केलेले ट्विट, शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ज्या भाषेचा उपयोग केला, त्याच्या विविध प्रतिक्रीया उमटल्या. त्यावरून अभिनेत्री कंगना रानावत यांना पाठींबा देत तीच्या निवासस्थानी जाऊन रामदास आठवेल यांनी भेट घेतली होती. यासंदर्भात आज आठवले यांनी आपली भूमिका काही प्रमाणात बदलली. ते म्हणाले, कंगना रानावतच्या भूमिकेशी मी सहमत नाही. तीच्या सर्व मतांशी देखील मी सहमत नाही. यासंदर्भात तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात योग्य ती चौकशी होईल. तीच्यावर अन्याय होतो आहे, या भूमिकेतून मी तीला पाठिंबा देत होते. 

लॉकडाऊनमध्ये दलितांवर अत्याचार

ते म्हणाले, देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनच्या काळात दलितांवर अत्याचार झाले. देशात जो जातीयवाद होतो, तो संपविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना मदत करण्याची सरकारची भूमीका आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन यावर नियोजन केले पाहिजे. तसा प्लॅन बनवला असता, तर कोरोणा रुग्णांची संख्या कमी झाली असती. 

ठाकरेंचं सरकार तीन पायांच

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेहेमीची टिका केली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं सरकार तीन पायांच सरकार आहे. उद्धव ठाकरे आमच्या सोबत आले, तर हे सरकार चार पायांचे होईल. ते सरकार पुढे चालू शकते. सिनेसृष्टीमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यात महिला कलाकारांची संख्या जास्त आहे. ड्रग्स प्रकरणातील कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. अनुराग कश्‍यप प्रकरणावर ते म्हणाले, अद्याप अनुराग कश्‍यपला अटक झालेली नाही. अशा प्रकरणात दिरंगाई होता कामा नये. दिग्दर्शक, निर्माते नवीन मुलींचा वापर करतात. सिनेसृष्टी मुंबईमधून हलवता कामा नये. ती मुंबईतच रहायला हवी. मात्र ड्रग्स घेणाऱ्या कलाकारांना कोणी काम दिलं तर आमचे कार्यकर्ते त्यांना धडा आम्ही शिकवणार. त्याबाबत आम्ही आंदोलन करून. प्रसंगी चित्रीकरण बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे काम चांगले आहे. त्यांनी महाराष्ट्रात चांगले काम केलेले आहे. त्यांना पक्ष बदलायचा असेल, तर त्यांनी आमच्या पक्षात यावे. त्यांना इतर पक्षात काहीच मिळणार नाही.

राष्ट्रपती राजवट नाही 

श्री. आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही, असे सांगितले. ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्था बिघडली तरच तसे होईल. लॉकडाऊनमुळे सर्व धर्माची मंदिरे बंद आहे. मंदिरे खुली करताना सर्व धर्माची मंदिरे खुली करावीत. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा. सरकारने सर्वांच्या भावनांचा विचार करावा. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख