रामदास आठवले म्हणाले, डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे !

लहानपणी माझा भ्रम होता, की डॉक्टर्स कधीच शिक्षकांसारखे मारत नाहीत, ते फक्त उपचार करतात. पण आज कळते की डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे. कोरोंना काळात अनेक डॉक्टर्स बाधित झाली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे.
रामदास आठवले म्हणाले, डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे !

नाशिक : लहानपणी माझा भ्रम होता, की डॉक्टर्स कधीच शिक्षकांसारखे मारत नाहीत, पण आज कळते की डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे. कोरोंना काळात अनेक डॉक्टर्स बाधित झाली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे.  मास्क वापरायला हवा असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले. 

येथील नारायणबापू नगर परिसरातील धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन श्री. आठवले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कते बोलत होते. ते म्हणाले, जनसेवेचे व्रत घेऊन अनेक डॉक्टर्स देशभरात काम करीत आहेत. कोविड काळात डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची राहिली आहे. बालपणी माझा असा भ्रम होता, की डॉक्टर्स कधीच मरत नाही, पण आज कळते की डॉक्टर हा सुधा माणूसच आहे. कोरोंना काळात अनेक डॉक्टर्स बाधित झाले आहेत. त्यासोबतच अनेक पोलिस कर्मचारी, पालिका कर्मचारी, शासकीय, अशासकीय संस्थांचे सेवाभाव ठेऊन कार्य करणारे अनेक लोक आज कोरोंना बाधीत झाले आहेत. कोरोंना रूग्णांच्या बाबतीत भारत दुस-या क्रमांकावर आहे.  महाराष्ट्रात दहा  हजारच्या वर नवीन केसेसची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगायला हवी. सोशल डिस्टन्सिंग ठेवायला हवे, मास्क वापरायला हवा. ही पत्थ्ये पाळलीच पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

आठवलेंनी कविता केलीच...
यावेळी श्री. आठवले यांना नेहेमीच्या शैलीत शीघ्र कविता करण्याचा मोह आवरला नाही. मी सध्या पत्थ्य पालतो आहे. त्यामुळे माझे शारीरिक वजन कमी झाले, पण माझे राजकीय वजन वाढले आहे, असे सांगून ते म्हणाले,  
आज माझे भरून आले आहे मन... 
कारण, माझ्या हस्ते होत आहे हॉस्पिटल चे उद्घाटन...
उपचारासाठी येथे येतील जन.... 
आता आला आहे तो क्षण.... 

संस्थेचे अध्यक्ष पंकज कुलकर्णी, दवाखान्याचे  संचालक डॉ. अजय तांबे, डॉ. योगेश गांगुर्डे, संतोष निकम, अजीत ठिकले, कमलेश घायाळ, राजू जगताप, परशुराम दीक्षित, नितिन कुलकर्णी, हेमंत बसेल, संजय शेजवळ, सूरज कुमार आदिंनी श्री. आठवले यांचे स्वागत केले. मुक्ता बेलोकर, वर्षा कुलकर्णी सूत्रसंचालन यांनी केले.

यावेळी प्रकाश लोंढे, नगरसेवक दिनकर आढाव, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका मंगला आढाव, समीर शेख, रवी वाघमारे, शेखर भालेराव, ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, हरिष भाडांगे, संजय भालेराव,  ब्रह्माकुमारी शक्तिदीदी आदी उपस्थित होते.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX_x7vpo&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=809d99bb219333b8f61e5ae0e50ae5e5&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com