दिलीप बनकर म्हणाले, शेतक-यांचे अश्रु पुसण्याचेही धाडस झाले नाही

सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तयार झालेल्या द्राक्षांच्या बागा रात्रूतन नष्ट झाल्या. आता या द्राक्षांचे बेदाणे देखील तयार होणार नाही. जीवापाड जपलेले पीक एका रात्रीत नष्ट झाल्याने हजारो शेतक-यांच्या डोळ्यातून अश्रु आलेत.
Dilip Bankar
Dilip Bankar

नाशिक : सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने तयार झालेल्या द्राक्षांच्या बागा रात्रूतन नष्ट झाल्या. आता या द्राक्षांचे बेदाणे देखील तयार होणार नाही. जीवापाड जपलेले पीक एका रात्रीत नष्ट झाल्याने हजारो शेतक-यांच्या डोळ्यातून अश्रु आलेत. ते नुकसान पाहून हे अश्रु पुसण्याचे सुद्धा धाडस होत नाही एव्हढा मोठा धक्का सगळ्यांना बसला आहे, असे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक असलेल्या द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यात शेतक-यांनी पीक संरक्षणासाठी मोठा खर्च केला आहे. अशा स्थितीत या शेतक-यांना दिलासा द्यावाच लागेल. त्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अशा सुचना आमदार बनकर यांनी दिल्या.   

गेले तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आमदार बनकर यांनी विविध पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पिंपळगाव बसवंत, नारायण टेंभी, दीक्षी, जिव्हाळे, कसबे सुकेने, खेरवाडी, सोनवाडी, साकोरे, कोकणगाव अशा अनेक गावांतील शेतक-यांनी याबाबत अडचणी सांगितल्या.

सबंध निफाड तालुक्यातच तीन दिवसाच्या अवकाळी पावसाच्या सरींच्या स्वरुपात निसग्राचे संकट कोसळले. द्राक्ष तयार झाली होती. त्यावर देखभालीसाठी मोठा खर्च झाला होता. अनेकांनी निर्यातक्षम द्राक्षे विक्रीसाठी व्यापारी वर्गांशी करार केले होते. काहींचे बोलणे सुरु होते. मात्र रात्रीच्या पावसाने सकाळी उन पडले अन् ही द्राक्षे तडकली. वाईनरी बंद आहेत. त्यामुळे वाईन होऊ शकत नाही. सील तडकली असल्याने त्याचे बेदाणेही होऊ शकत नाही. स्थानिकल बाजारतही त्याची विक्री शक्य नाही. त्यामुळे अगदी सर्व काही नष्ट झाले. आधी पाऊस, नंतर कोरोना व आत्ता सलग तिसरे वर्षे पावसाने नुकसान होत असल्यावे शेतकरी रडतो आहे. त्याच्या डोळ्यातले अश्रु थांबण्याची चिन्हे नाहीत. ते पाहून आम्ही तरी काय धीर देणार? राज्य सरकार मदत देईल. त्यात नुकसान भरुन निघणार नाही. त्यामुळे केंद्रानेही मदतीसाठी पुढे आले पाहिजे. 

निफाड तालुक्यात अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण आहेत. गुरुवारपासून शनिवार पर्यंत झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतीला झोडपले. त्यात मोठा खर्च करून कष्टातून पिकवलेल्या द्राक्षपिकाचे मोठे नुकसान झाले. सुरवातीला छाटणी केलेले द्राक्षपीक काढणीसाठी आलेले असताना हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. 

यासंदर्भात तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश आमदार बनकर यांनी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे व तालुका कृषी अधिकारी भटू पाटील यांना दिले. 
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com