परिपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयासाठी आराखडा करावा

राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सर्व सुविधांनी पूर्ण आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. (Medical collage building will be construct MUHS & State Govt. Commonly)  त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सर्व सुविधांनी पूर्ण आराखडा तयार करावा, (Prepare complete plan For medical Collage) अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महापालिकेचे उपायुक्त मनोज घोडे- पाटील, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक डॉ. संदीप गुंडरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एन. राजभोज, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर आदी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, की वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीसाठी राज्य शासनामार्फत ६० टक्के व आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मुख्य सचिवांच्या बैठकीत निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पाच्या कामकाजाला सुरवात करावी. भविष्यातील पुढील प्रकल्पांना अनुकरणीय ठरावी, अशी इमारतीची रचना करावी. इमारतीच्या आराखड्यासाठी लवकर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाला गती देण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com