फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा जळगावमध्ये निषेध 

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना चांगले उपचार मिळत नसल्याचे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते. गोदावरी मेडिकल स्टाफने त्याचा निषेध केला आहे.
Protest against that statement of Devendra Fadnavis in Jalgaon
Protest against that statement of Devendra Fadnavis in Jalgaon

जळगाव : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना चांगले उपचार मिळत नसल्याचे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते. गोदावरी मेडिकल स्टाफने त्याचा निषेध केला असून राजकीय नेत्यांनी कोणतीही माहिती न घेता निराधार आरोप केल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

गोदावरी मेडिकल स्टाफ तर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या संकटकाळात आरोग्य यंत्रणांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य सातत्याने राजकीय नेत्यांकडून होत आहे. अशा वक्तव्यांमुळे डॉक्‍टर, परिचारिका, स्टाफ हे व्यथित होत असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी (ता. 9 जुलै) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रुग्णाची गैरसोय होते. सेवा शुश्रूषा व्यवस्थित होत नसल्याचा तथ्यहीन आरोप केला.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संबंधित निराधार आरोप राजकीय नेत्यांकडून केले जात आहे. प्रत्यक्षात कुठलीही वस्तुस्थिती जाणून न घेता वारंवार डॉ. उल्हास पाटील रुग्णालयावर रुग्णाची गैरसोय होत असल्याचा आरोप केले जात आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका, मेडीकल स्टोअर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार असे अनेक जण स्वत:च्या घरापासून लांब राहून रात्रंदिवस रुग्णसेवेसाठी राबत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही तथाकथित राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी आरोप करून रूग्णसेवेत नेत्यांकडून अडथळे आणले जात आहे. 

राजकीय नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून न घेता निराधार आरोप केल्यास रुग्णालयातील सर्व कर्मचारी, परिचारिका हे कामबंद आंदोलन पुकारतील, असा इशारा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच, गुरुवारी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही माहिती न घेता आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचाही परिचारिकांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 

हेही वाचा : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार रात्रीपासून दहा दिवसांचा पुन्हा कडक लाॅकडाऊन

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड या दोन पोलिस आयुक्तालयातील संपूर्ण हद्दीसह या शहरांजवळील चाकण, वाघोली, हिंजवडी या भागांत येत्या 13 जुलैपासून दहा दिवसांसाठी 23 जुलैपर्य़ंत लाॅकडाऊनची घोषणा आज करण्यात आली. फक्त अत्यावश्यक सेवा या कालावधीत सुरू राहणार आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ही साखळी ब्रेक झाल्यानंतर कोरोनाच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी या लाॅकडाऊनचा उपयोग होणार आहे.  

या दोन्ही शहरांत कोरोनाच्या केसेस वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील दोन दिवस जनतेला पूर्वतयारीसाठी देण्यात आले आहेत. दूध, औषधे, भाजीपाला इतक्याच बाबी लाॅकडाऊन काळात सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा आढावा आज बैठकीत घेतल्यानंतर त्याची घोषणा करण्यात आली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com