कोरोनाच्या पराभवासाठी खाजगी डॅाक्टरांनीही शासनासोबत यावे!

कोविड 19 हे मोठे संकट आहे. त्याच्या पराभवासाठी एकजुट आवश्यक आहे. त्यामुळे खाजगी डॅाक्टरांनी देखील कोरोना विरोधातील लढाईत राज्य शासनाच्या मदतीला यावे. जनतेच्या मदतीने कोरोनावर निश्चित विजय मिळेल, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या पराभवासाठी खाजगी डॅाक्टरांनीही शासनासोबत यावे!

नाशिक : कोविड 19 हे मोठे संकट आहे. त्याच्या पराभवासाठी एकजुट आवश्यक आहे. त्यामुळे खाजगी डॅाक्टरांनी देखील कोरोना विरोधातील लढाईत राज्य शासनाच्या मदतीला यावे. जनतेच्या मदतीने कोरोनावर निश्चित विजय मिळेल, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या डॉक्टर सेल सह राज्यातील सर्वच पॅथीच्या डॉक्टरांच्या संघटनांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीचे समन्वय डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. 

यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील सदस्यांनी विविध सूचना केल्या. यावर श्री. टोपे म्हणाले, कोविड परीस्थितीत डॉक्टरांसमोर निर्माण झालेले विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोविड रूग्णांना आरोग्य विषय सुविधा पुरविण्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी त्यांनी दिली. त्याच बरोबर राज्य शासन चांगल्या दर्जाचे व नियंत्रित किंमती मध्ये पपीइ किट, एन 95 मास्क सर्व जिल्हय़ातील सर्जिकल दुकानांमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, नॉन कोविड रुग्णांना उपचार देणार्‍या खाजगी डॉक्टरांना विमा मिळाला पाहिजे, या खाजगी डॅाक्टरांच्या मागणीचे विचार करण्याचे श्वासन दिले. 

श्री. टोपे म्हणाले, खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याने  अॅंटीजेन व अॅंटीबॅाडी चाचण्यांची खाजगी लॅबला परवानगी देण्याचा सकारात्मक विचार झाला आहे. राज्यातील आरोग्यसेवेतील रीक्त जागा लवकरात लवकर भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आयुर्वेद व युनानी डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ. होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय पदांवर नियुक्तीसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनातील डेंटल सर्जनच्या रीकाम्या जागा न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर भरण्यात येतील, तोपर्यंत या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचे सुतोवाच आरोग्यमंत्र्यांनी केले. 

यावेळी विशेष निमंत्रित म्हणून आय. एम. ए. चे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, निमाचे डॉ. टेंभुर्णीकर व डॉ. आशुतोष कुलकर्णी, इंडीयन डेंटल असोसिएशन चे डॉ. बजरंग शिंदे, युनानी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. झुबेर शेख, फिजिओथेरपी कॉन्सिल चे अध्यक्ष डॉ. सुदीप काळे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. डि. एन. चिंते, महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल चे सदस्य डॉ. संजय कदम, रेडीओलॉजिस्ट डॉ. अजय जाधव, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप आदी सहभागी झाले. 
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=-MCHEjIMfxQAX_7GL5b&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=cd63c150cf422eac776fce2792a792af&oe=5F2911A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com