कोरोनाच्या लढाईत खाजगी डॉक्टर, नर्स, संस्था महत्त्वाच्या 

कोरोनाच्या या लढाईत खाजगी डॉक्टर्स, नर्स व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

लासलगांव : कोरोनाच्या या लढाईत खाजगी डॉक्टर्स, नर्स व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दररोज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात येत आहे. आज त्यांनी येवला दौऱ्यावर असतांना विंचूर व लासलगाव येथील डेडिकेटेड कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी रुग्णांना योग्य प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात की नाही याची खातरजमा करत रुग्णांची चौकशी केली, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर असतांना प्रथमतः विंचूर येथे उभारण्यात आलेल्या खाजगी कोविड केअर सेंटरची पाहणी करत. डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.त्यानंतर त्यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सद्या ३० बेडस कार्यान्वित असून अधिक १० ऑक्सिजन बेडस वाढविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ते म्हणाले की, मनुष्य वाचविण्याची ही संकटाची लढाई असून खाजगी डॉक्टर, नर्स व स्वयंसेवी संस्थानी यांनीही या लढ्यात उतरावे.

लासलगाव उड्डाणपूलाची पाहणी
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल व बायपास रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भूसंपदानाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून घ्याव्यात असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी तहसिलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, सरपंच सचिन दरेकर, भाऊसाहेब भवर, पांडुरंग राऊत, आनंद मवाळ, डॉ.चंद्रकांत ठाकरे, डॉ.शैलेश काळे , डॉ. किशोर चौधरी, डॉ.सचिन जेऊघाले, ग्रामसेवक जी.टी. खैरनार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com