संतप्त सभापती म्हणाले, `आदिवासी आहोत म्हणून डावलता काय?` - President angree, Asked you are ignore us because of Trible, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

संतप्त सभापती म्हणाले, `आदिवासी आहोत म्हणून डावलता काय?`

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आदिवासी सभापती व सदस्य चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यास कारणही तसेच ठरले. राज्यात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ६ जूनला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर भगवा ध्वजारोहण करण्याच्या सूचना होत्या. त्र्यंबकेश्‍वर येथे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी सभापतींच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण केले.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत (Trible members angree in ZP G. B. Meeting) आदिवासी सभापती व सदस्य चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यास कारणही तसेच ठरले. राज्यात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ६ जूनला (Coronation ceremoney of Shivaji maharaj Eve) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर भगवा ध्वजारोहण करण्याच्या सूचना होत्या. त्र्यंबकेश्‍वर येथे गटविकास अधिकारी किरण जाधव (BDO Kiran Jadhav) यांनी सभापतींच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण केले.

यावर सभापती मोतीराम दिवे यांनी सभेत प्रश्‍न विचारत ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करायचे होते, गटविकास अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारात ते केले, असा सवाल केला. यावर प्रशासनाने ध्वजारोहण कोणी करायचे याबाबत शासनाकडून कोणतीच माहिती नसल्याचे सांगतले. 

या संदर्भात श्री. दिवे यांनी आपणास याबाबत का सांगण्यात आले नाही. पंचायत समितीत सभापतींसाठी वाहन उपलब्ध असतानाही घेण्यास पाठविण्यात आले नाही. तसेच मागील दोन ते तीन महिन्यांपासून वाहन उभे आहे. त्याला काय झाले आहे, याची माहिती दिली जात नाही. केवळ आम्ही आदिवासी आहोत, म्हणून अधिकाऱ्यांकडून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनीही आवाज उठवीत असा अन्याय सहन केला जाणार नाही, असे सांगून कारवाईची मागणी केली. श्री. दिवे यांनीही बीडीओ आणि वाहनचालकाची चौकशी करत करवाईची मागणी केली. यावर इतर आदिवासी सदस्य आणि सभापतींनी आक्रमक होत प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला.

अध्यक्ष क्षीरसागर यांनी यावर तातडीने या प्रकरणाची चौकशी करत संबंधित सर्व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी या प्रकरणी तत्काळ नोटीस बजावून चौकशी करत अहवालानंतर कारवाईबाबात आश्‍वासन दिले.

बागलाणच्या सभापती रेखा पवार यांनी अपूर्ण कामावरून पाणीपुरवठा विभागास चांगलेच धारेवर घेत जाब विचारला. यावर अधिकाऱ्यांनी माहिती घेऊ, असे सांगितले. नंतर मागील चार वर्षांपासून हेच ऐकत असल्याचे सांगत प्रशासनावर राग व्यक्त केला. केवळ आदिवासी असल्याने अधिकारी लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
...
हेही वाचा...

भाजपचा शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना `दे धक्का`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख