हाऊसिंग कार्पोरेशनच्या संचालकपदी प्रथमेश गिते

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन या सहकारी गृहनिर्माण संस्थांना पतपुरवठा करणाऱ्या शिखर संस्थेच्या नाशिक विभागीय संचालकपदी माजी उपमहापौर प्रथमेश वसंतराव गिते यांची बिनविरोध निवड झाली.
हाऊसिंग कार्पोरेशनच्या संचालकपदी प्रथमेश गिते
Prathmesh Gite

नाशिक : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (Maharashtra state co-operative housing finance corporation) या सहकारी गृहनिर्माण संस्थांना पतपुरवठा करणाऱ्या शिखर संस्थेच्या नाशिक विभागीय संचालकपदी (Nashik divisional director) माजी उपमहापौर प्रथमेश वसंतराव गिते (Prathmesh Gite) यांची बिनविरोध निवड झाली.

श्री. गिते भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहेत. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले व शहराची माजी महापौर, माजी आणदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचे ते पुत्र आहेत. श्री. गिते यांच्या निमित्ताने भाजपचे एक मोठे नेते शिवसेनेत दाखल झाल्याने शहरातील विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र बदलण्यात त्याचा मोठा हातभार लागला आहे. या घडामोडींतूनच राज्य शासनाकडून ही नियुक्ती झाल्याचे बोलले जाते.  

या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे ज्येष्ठ संचालक अंकुश काकडे, नाशिकचे विभागीय संचालक बाळासाहेब सानप यांनी सहकार्य केल्याचे त्यांन सांगितले. 
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.