युरियासाठी `प्रहार` संघटनेचे अर्धनग्न होऊन आंदोलन

पिके जोमात आहेत, त्यांना युरिया व खतांची नितांत आवश्यकता असताना लिंकिंग व काळ्याबाजारामुळे तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हितासाठी येथील प्रहार संघटनेने आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.
Prahar yeola
Prahar yeola

येवला : पिके जोमात आहेत, (Crops need uria since they are in full swing) त्यांना युरिया व खतांची नितांत आवश्यकता असताना लिंकिंग व काळ्याबाजारामुळे तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला आहे. (Farmers doesn`t get uria due to black marketing) त्यामुळे शेतकरी हितासाठी येथील प्रहार संघटनेने (Prahar Sanghtna) आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. 

युरिया आमच्या हक्काचा..तो मिळालाच पाहिजे अशी जोरदार मागणी केली. या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली असून सायंकाळी उशिरापर्यंत विक्रेत्यासोबत बैठका सुरू होत्या.

तालुक्यात मोठेमोठे विक्रेते असताना दीड महिन्यापासून शेतकरी युरियासाठी वणवण फिरत असून युरियाच्या एक गोणीसाठी अनेक निकष पार करण्याची वेळ येत आहेत. २६६ रुपयांच्या एक गोणी बरोबर १४०० रुपये किंमतीची दुसऱ्या खताची गोणी,किंवा इतर खत घेण्याची सक्ती दुकानदारांकडून केली जात असल्याचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष हरीभाऊ महाजन यांनी सांगितले आहे.

कृषी विभागाचा विक्रेत्यांवर कुठलाच धाक राहिलेला नसून दुकानदार तर कंपनीकडूनच लिंकींग होत असून पुरेसा साठा मिळत नसल्याने टंचाई निर्माण होत असल्याचे सांगतात. शेतकऱ्याच्या तक्रारी व अडचण लक्षात घेऊन प्रहार संघटनेने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र कुठलीही कार्यवाही झालेली नसून मागणी मान्य न झाल्याने आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर जमून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होत ठिय्या आंदोलनाला दुपारी बाराला सुरुवात केली. जोरदार घोषणाबाजी करतानाच यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याची मागणीही करण्यात आली.अखेर सायंकाळी कृषी अधिकारी व विक्रेत्यां सोबत बैठकांचे सत्र सुरू झाले होते.या आंदोलनानंतर तरी शेतकऱ्यांना युरिया अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रहार संघटना तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे हितेश दाभाडे, अमोल फरताळे, वसंत झांबरे, किरण चरमळ, रामभाऊ नाईकवाडे, जगदीश गायकवाड, सचिन पवार, बाळासाहेब बोराडे, गणेश लोहकरे, संतोष जाधव, राहुल बारहाते, चेतन बोरणारे, अमोल नाईकवाडे, समाधान शेटे, गणेश बोराडे आदी आंदोलनात सहभागी झाले. 

...
आठ-दहा दिवसात युरिया खूप गरजेचा आहे. नंतर त्याला कोणी विचारणारही नाही. त्यामुळे युरियाची लिंकिंग न करता विनाअट शेतकऱ्यांना मिळावा. मात्र सद्या एक गोणी मिळणे अवघड झाले असून हा प्रकार थांबावा. तत्काळ विनाअट युरिया मिळावा यासाठी आज आंदोलन केले.
- किरण चरमळ, प्रहार संघटना, येवला.
....
हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com