`कोरोना`च्या मृत्यूंबाबत महापालिकेसमोर केले तिरडीसह आंदोलन ! - Prahar deemanded strict action against covid-19 in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

`कोरोना`च्या मृत्यूंबाबत महापालिकेसमोर केले तिरडीसह आंदोलन !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

शहराची परीस्थिती अतिशय धोकेदायक होत आहे. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडताना दिसते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत.

नाशिक : गेल्या १५ दिवसापासून शहरामध्ये कोरोनामुळे वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ही बाब अतिशय चिंताजनक व गंभीर आहे. त्यामुळे शहराची परीस्थिती अतिशय धोकेदायक होत आहे. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडताना दिसते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागंणी प्रहार संघटनेने केली आहे. 

संघटनेतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आवे. तसेच महापालिका मुख्यालयाच्या आवारात काही वेळ धरणे धरण्यात आले. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिका-यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविले आहे. आरोग्यसेवेच्या अभावामुळे अनेक रुग्ण आपल्या घरामध्ये असुरक्षित आहेत. त्यामुळे त्या कुटुंबात देखील संसर्ग आजाराचा फैलाव होत आहे. याकरीता जुलै महिन्यामध्ये जिल्हाधिकारी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये कुठेही नवीन कोविड सेंटरची उभारणी होताना दिसत नाही. शहरातील आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे की, काय अशी शंका येते. प्रशासनाने गांभीर्याने पहावे. अन्यथा आगामी काळामध्ये मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

यावेळी पदाधिकारी म्हणाले, कोरोनाचा प्रसार वाढल्यास शहरातील नागरिकांची आर्थिक व शारीरिक हानी देखील मोठ्या प्रमाणात होईल. खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या वेगळ्या तक्रारी आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री आरोग्य योजना यामध्ये जे काही रुग्णालय समाविष्ट केलेले आहे, आशा रुग्णालयाची माहिती नागरिकांना नसते. या योजनेत अंगीकृत रुग्णालय आहेत, तसे फलक रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात यावेत. या योजनेचे कवच असतानादेखील शासन व जनतेचीही फसवणूक होत आहे. रुग्ण व हॉस्पिटलचे व्यावस्थापनात बिलांकरीता अनेक वेळा वाद निर्माण होतात. 

निवेदनातील उपाय योजना न केल्यास येणाऱ्या आगामी काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण ,कार्याध्यक्ष मोतीलाल चव्हाण, वैभव देशमुख, शहरप्रमुख श्याम गोसावी, समाधान बागल, विकास जाधव आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. 
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख