political leaders school in Trible goesh ahesd in marks | Sarkarnama

आदिवासी भागातील नेत्यांच्या शाळांवर पडला गुणांचा पाऊस!

संपत देवगिरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. विभागाचा निकाल ९३.७३ टक्‍के लागला. मात्र शहरातील सर्व सुविधा, सराव असलेल्या मुलांपेक्षा नाशिकच्याआदिवासी मुलांनी त्यात बाजी मारली.

नाशिक :  महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा विभागाचा निकाल ९३.७३ टक्‍के लागला. मात्र शहरातील सर्व सुविधा, सराव असलेल्या मुलांपेक्षा नाशिकच्याआदिवासी मुलांनी त्यात बाजी मारली. त्यामुळे यावर विचार मंथन झाले पाहिजे, असा सुर शिक्षणतज्ञांनी व्यक्त केला आहे. 

या आदिवासी भागातील शाळा या राजकीय नेते, आमदार, खासदारांशी संबंधीत आहेत. येथील बव्हंशी शिक्षक शाळा असलेल्या गावांत रहात नाहीत. अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी असतात. येथील शैक्षणीक दर्जाबाबत अगदी आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभागाकडेही तक्रारी असतात. योगायोग म्हणजे या राजकीय नेत्यांच्या शाळांवर गुणांचा पाऊस पडला आहे. 

राज्‍याप्रमाणे नाशिक विभागातही मुलींनीच बाजी मारलेली आहे. चारही जिल्ह्यांत मुलांच्‍या टक्‍केवारीच्‍या तुलनेत मुलींची आघाडी असल्‍याचे चित्र आहे. नाशिक जिल्‍ह्या‍त उत्तीर्ण मुलांची टक्‍केवारी ९३.६१ टक्‍के असून, मुलींची ९६.४३ टक्‍के आहे. धुळ्यात मुले ९३.३० टक्‍के, तर मुली ९६.११ टक्‍के असे आहे. जळगावला ९२.१० टक्‍के मुले उत्तीर्ण झाले असून, ९५.४० टक्‍के मुली उत्तीर्ण झाल्‍या आहेत. नंदुरबार जिल्‍ह्या‍त मुलांच्‍या उत्तीर्णाचे प्रमाण ८५.९६ टक्‍के असून, मुलींच्‍या उत्तीर्णाचे प्रमाण ९०.७० टक्‍के इतके आहे. मात्र यातही ग्रामीण भागाने अधिक जास्त आघाडी घेतलेली दिसते.  

या परिक्षेत नाशिक शहरातील निकाल 91.48 टक्के होता. मात्र जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा 96.73, त्र्यंबकेश्वर 96.86, कळवण 96.15, इगतपुरी 94.36, पेठ 92.90 टक्के असा होता. हे सर्व तालुके आदिवासी व दुर्गम भागात मोडतात. या निकलाचा अर्थ आदिवासी भागात शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा असूनही, निकाल जास्त आणि शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या पालकांचे लाड, हमखास क्लास, विशेष मार्गदर्शन, घरची  शिकवणी, सराव या सोयी सुविधा असूनही निकालाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी कुठे कमी पडले, त्यांचे काय चुकले यावर विचार मंथनाची गरज आहे. असा मतप्रवाह आहे. 
....
शहरी भाग कुठे मागे पडला याचा विचार झाला पाहिजे. राज्यात  15.75 लाख लाख विध्यार्थ्यांपैकी 15 लाखाच्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  गेल्या वर्षी 80 गुण टक्के परिक्षा व 20 टक्के गुण  तोंडी ही सुविधा नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी  78.86 निकाल होता. यंदा तोंडी व अंतर्गत मूल्यांकनामुळे फुगा फुगला आहे. - प्राचार्य हरिष आडके.
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख