पूजा केली जितेंद्र आव्हाडांनी; पोलिसांनी धरले कार्यकर्त्यांना! - Police register case against Jitendra Avhad followers, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

पूजा केली जितेंद्र आव्हाडांनी; पोलिसांनी धरले कार्यकर्त्यांना!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

राज्‍याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील नवश्‍या गणपती मंदिरात रविवारी देवदर्शन घेत आरती केली होती. यावेळी कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याची टीका झाली. त्यामुळे काल पोलिसांनी आव्हाडांसमवेत मंदिरात गेलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.

नाशिक : राज्‍याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील नवश्‍या गणपती मंदिरात रविवारी देवदर्शन घेत आरती केली होती. (Housing minister Jitendra Avhad worship at Navshya Ganpati on Sunday) यावेळी कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याची टीका झाली. (People criticise them for violation of covid19 rules) मुळे काल पोलिसांनी आव्हाडांसमवेत मंदिरात गेलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांची आरती कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडली आहे. 

याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी वर टिका केली होती. सामान्‍यांसाठी असलेले कोरोनाचे निर्बंध मंत्र्यांना लागू नाहीत का, असा प्रश्‍न उपस्‍थित झाला होता. मंत्री आव्‍हाड यांनी पूजाविधी केला असताना, गुन्‍हा मात्र कार्यकर्त्यांविरोधात दाखल झाला आहे. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या पाच जणांविरोधात गंगापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. श्री. आव्हाड यांनी त्र्यंबकेश्वर येथेही भेट दिली होती. तेथे मात्र पोलिसांनी कारवाई केलेली नाही. 

कोरोना महामारीत वीकेंड लॉकडाउन व अन्‍य निर्बंध लागू आहेत. असे असताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी नवश्‍या गणपती मंदिरात रविवारी पूजा व आरती केली होती. या घटनेनंतर मंत्री आव्‍हाड यांच्‍यावर टीकेची झोड उठली होती. या घटनेच्‍या दुसऱ्या दिवशी सोमवारी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. असे असले तरी मंत्री आव्‍हाड यांच्‍यावर कुठल्‍याही स्‍वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. 

कोरोना प्रादुर्भावामुळे अधिसूचनांकडे दुर्लक्ष करून नवश्‍या गणपती मंदिरात दर्शन व आरती करणाऱ्या पाच भाविकांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. मनाई आदेश असताना, नियमांचे पालन न केल्‍याने हवालदार एस. एन. बच्‍छाव यांच्‍या फिर्यादीवरून हा गुन्‍हा दाखल झाला आहे. योगेश नामदेव दराडे, स्‍वप्‍नील प्रभाकर चिंचोले, (रा. अश्‍विननगर, सिडको), विक्रांत उल्‍लास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळीबा घुगे (रा. मोरवाडी गाव, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. नियमांचे उल्‍लंघन करत देवदर्शन करताना मंत्री जितेंद्र आव्‍हाड पोलिसांच्‍या कारवाईपासूनही बचावले आहेत. 
 ...
हेही वाचा...

चंद्रकांत पाटील यांची पाठ फिरताच भाजपमध्ये बंडखोरी?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख