दलितांसाठी दहा एकर जमीन देणारे पोलिस निरीक्षक आहेत तरी कोण? - Police inspector Who donate Ten acre land to dalit Family | Politics Marathi News - Sarkarnama

दलितांसाठी दहा एकर जमीन देणारे पोलिस निरीक्षक आहेत तरी कोण?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सरकारी सेवेत, त्यातही पोलिस दलात कार्यरत असुनही त्यांच्या विषयी लोक चांगले बोलले. त्यांचे सहकारी त्यांच्या कामाचे कौतुक करायचे. असे क्वचितच घडते. मात्र असे घडले आहे, येथील इंदिरानगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक पांडुंरंग पाटील यांच्या विषयी.

नाशिक : सरकारी सेवेत, त्यातही पोलिस दलात कार्यरत असुनही त्यांच्या विषयी लोक चांगले बोलले. त्यांचे सहकारी त्यांच्या कामाचे कौतुक करायचे. असे क्वचितच घडते. मात्र असे घडले आहे, येथील इंदिरानगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक पांडुंरंग पाटील यांच्या विषयी. एव्हढेच काय, ते काल निवृत्त झाले, तेव्हा त्यांचे सर्व सहकारी त्यांना निरोप देण्यासाठी जमले होते. त्याचे कारणही असेच होते. 

इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पाटील यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देतांना उपायुक्त विजय खरात शेजारी सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी आणि वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांसह सर्व कर्मचारी, सहकारी आवर्जुन उपस्थित राहिले. निरीक्षक पाटील आपल्या चाळीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. 1980 साली धुळे येथे कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. यापूर्वी सटाणा येथे कार्यरत असताना त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या कारवाई चे प्रकरण थेट विधिमंडळात गाजले होते. दादासाहेब गायकवाड दलित सबलीकरण योजने अंतर्गत त्यांनी धुळे जिल्ह्यातील वेल्हाने (देवाचे) येथील स्वतःच्या मालकीची दहा एकर जमीन प्रत्येकी अडीच एकर याप्रमाणे चार दलितांच्या नावे करून पोलीस दलात एक आदर्श निर्माण केला आहे .

पोलिस उपायुक्त विजय खरात आणि सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा आणि त्यांच्या पत्नी सौ ज्योत्सना पाटील सत्कार करण्यात आला. त्यावेळी यांची मुले हर्षवर्धन आणि आशुतोष पाटील, इंदिरानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शांतता समितीचे सदस्य, पोलीस मित्र ,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी आभार मानले.
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख