हेलीकाॅप्टर कोसळल्यावर `ती`ने अंगावरचं लुगडं फेडून जखमींसाठी झोळी केली!

शिरपूरच्या निम्स अकादमीच्या हेलिकाॅप्टरदुर्घटनेत जखमी प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाच्या मदतीसाठी रुग्णवाहिका पोचणे कठीण होते. अशा स्थितीत या जखमी वैमानिकास आदिवासी पाड्यातील ‘बांबुलन्स’ उपलब्ध करण्यात आली, त्यासाठी स्वत:चे लुगडे देणाऱ्या विमलंबाईंचा गुरुवारी जिल्हा पोलिस दलाने साडीचोळी देत गौरव केला.
Vimalbai
Vimalbai

जळगाव : शिरपूरच्या निम्स अॅकॅडमीच्या विमान दुर्घटनेत जखमी प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाच्या मदतीसाठी रुग्णवाहिका पोचणे कठीण होते. (It is quite hard to reach ambulance on accident spot) अशा स्थितीत या जखमी वैमानिकास आदिवासी पाड्यातील ‘बांबुलन्स’ उपलब्ध करण्यात आली, त्यासाठी स्वत:चे लुगडे देणाऱ्या विमलंबाईंचा (Vimalbai given her saree) गुरुवारी जिल्हा पोलिस दलाने साडीचोळी देत गौरव (Police falicitate Vimalbai for her extra ordinery courage of help)  केला.

वर्डी (ता. चोपडा) येथे विमलबाई हिरामण भिल (वय ६१) या पती हिरामण, दोन मुले नातवंडांसह वास्तव्यास आहेत. गावात शेती करून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. विमान दुर्घटनेच्या वेळी विमलबाई दोन सुनांसोबत शेतात काम करत होत्या. या अपघातात वैमानिक नुरल हसन (वय २८, बेंगळुरू) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आणि विमानाच्या अवशेषांमध्ये अडकून पडलेली महिला पायलट अंशिका गुजर गंभीर जखमी असल्याचे आढळून आले. रमेश बारेला आणि इतर ग्रामस्थ तरुणांनी प्रयत्न करून महिला पायलट अंशिका यांना बाहेर काढले. ॲम्ब्युलन्स या दुर्गम पर्वतावर पोचत नाही म्हणून त्यांना बांबूची झोळी करून नेण्याचा तत्काळ निर्णय घेण्यात आला.
अंगावरचे लुगडे काढले

जखमीला तातडीने रुग्णलयात नेण्यासाठी घटनास्थळी कुठलेच कापड किंवा काहीच साहित्य नव्हते. विमलबाईंनी झोळी करा रे, असे सांगितले पण झोळी करणार कसली? म्हणून कुठलाही विचार न करता विमलबाईंनी अंगावरचे लुगडं झोळीसाठी काढून दिले.
पोलिस दलाकडून कृतज्ञता

निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या घटनेचा आढावा घेत जळगावी अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनाही अपघाताच्या माहितीसह विमलबाईंचे प्रसंगावधान सांगितले. अखेर पोलिस दलाने या महिलेचे सामाजिक जाणिवेतून सत्कार करण्याचा निर्णय घेतला. गुन्हे शाखेतील दिनेश बडगुजर, श्रीकृष्ण पटवर्धन, जयंत चौधरी, नरेंद्र वारुळे, प्रदीप पाटील, विजय ताटील, मीनल साखळीकर, अशांनी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून विमलबाईंना साडी-चोळी, मिठाई आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com