पोलिस आयुक्त दीपक पांडेचे आता, `हर घर छोटा पोलीस`

शहरातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ‘हर घर छोटा पोलीस, कमी वेळेत प्रभावी उपाययोजना यासारख्या व्यापक संकल्पना राबवण्याचा मनोदय, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी व्यक्त केला आहे.
पोलिस आयुक्त दीपक पांडेचे आता, `हर घर छोटा पोलीस`

नाशिक : शहरातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ‘हर घर छोटा पोलीस, कमी वेळेत प्रभावी उपाययोजना यासारख्या व्यापक संकल्पना राबवण्याचा मनोदय, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी व्यक्त केला आहे. 

कोरोनच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांसाठी दिनचर्या तयार करण्यापासून तर पोलिसांत दर शनिवारी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलिसांत मिसळून अडचणी जाणून घेण्याची त्यांची शैली पोलिसांत लोकप्रिय ठरते आहे. बोलण्यापेक्षा लेखी आदेश बजावत धडाकेबाज निर्णयामुळे अल्पावधीतच चर्चेत आलेले पोलीस आयुक्त पांडे यांनी कोरोनावर मात करण्यासाठी त्यांचे स्वताचे म्हणून काही निष्कर्ष आहेत. त्यानुसार, पोलिस कोवीड सेंटरमध्ये कामकाज चालते. विशेष म्हणजे, पोलिस कोवीड सेंटरमधील दिनचर्येचे रिल्झट चांगले असून शंभर पोलिस बरे झाले आहेत.

आरोग्यदायी दिनचर्या
श्री पांडे म्हणाले, कोरोना सगळ्यांसाठी नवे संकट आहे. कोरोनाविषयी सर्वत्र भिती-अज्ञान असतांना लॉकडाउन- अनलॉक अंमलबजावणीच्या निमित्ताने सर्वप्रथम रस्त्यावर पोलिसांना लढाई लढावी लागली. कोरोनाविषयी भिती वाढत असतांना, रस्त्यावर लढणाऱ्या पोलिसांचे पोलिसांचे मनोबल उंचविण्यासाठी काळजी घेणे ही शहर पोलिसांचा कुंटुबप्रमुख म्हणून माझे आद्य कर्तव्य होते. जर माझ्या पोलीसांचे मनोबल खचले तर लढाई कशी लढणार ? हा प्रश्‍न होता. त्यामुळे सर्वप्रथम मी पोलीस कोविड सेंटर निर्मितीला प्राधान्य दिले. नुसते सेंटर उभारुन चालणार नव्हते. त्यात रुग्णवाहिका, प्राणवायू, बेडपासून तर प्रसंगी मुंबईतील वैद्यकिय मार्गदर्शन उपलब्ध होईल. अशी व्यवस्थेचे अद्यावत सेंटर उभारले. तुरुंग महानिरीक्षक म्हणून मुंबईत काम करतांना तेथील अनुभव कामी आला. ॲलोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार यआहार-दैनंदिनी (लाईफ स्टाईल) या चार बाबीवर लक्ष केंद्रीत करुन पोलिसांची म्हणून एक दिनचर्या बनविली. पहाटे उठल्यानंतर चालणे, योगा, प्राणायाम अनुलोम-विलोम गोल्डन टी, आहार, सलाड असे सगळ्यांचा सूत्ररुपाने एकत्रित दिनचर्या केली. अपेक्षेप्रमाणे त्याचे चांगले परिणाम मिळाले. ११९ दाखल झाले. ८१ घरी सोडले, १२ जण उपचार घेत आहे. तर उपचाराची गरज असलेल्या २६ जणांना वेळीच स्थलांतरीत करता आले. त्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शंभर टक्के राहिले.

मात-संवाद- विश्‍वास....
कोरोना सेंटरनंतर पोलिसात विश्‍वास करुन त्यांना कार्यप्रणव करणे हे आव्हान होते. आठवड्यातील प्रत्येक शनिवारी पोलीस ठाण्यात जनता दरबाराचा उपक्रम सुरु केला. कुठल्या देणगीदारांच्या नव्हे तर पोलीस फंडाच्या पैशातून दर शनिवारी पोलिसांसोबत बैठका, चर्चा, स्नेहभोजन घेतो. दिवसभर पोलीस ठाण्यातील माझ्या कामकाजातील सहभागामुळे तेथील नागरिकांच्या आणि माझ्या पोलिसांच्या अडचणी समजतात. पोलिसांना कुटुंबप्रमुख आपल्यासोबत आहे यातून विश्‍वास दिसतो आहे. महिणाभरात त्याचे परिणाम दिसू लागले. माझे पोलीस स्वताहून सक्रियपणे रिल्‍झट देऊ लागले आहे.गुलाब सोनार कुटुंबासह सुट्टीवर असतांना त्यांनी सराईत सोनसाखळ्या चोर पकडले. यात पत्नी ज्योती व साडू सहभागी झाले. कोबींगच्या निमित्ताने एकाचवेळी शहरातील ६०० पोलीस अवघे दोन तास रस्त्यावर उतरले ३१ पैकी २० आॅपरेशन केले. इतक्या कमी वेळेत सगळ्या शहरभर झटपट हे आॅपरेशन झाले. या प्रतिनिधीक घटना म्हणजे माझी टीम मोटीव्हेट होत असल्याचे उदाहरण आहे.कोरोनातून बाहेर पडण्याचे उपाय यशस्वी होत असल्याचे अनेक उदाहरण आहेत. आधी कोरोनावर मात त्यानंतर संवाद आणि टिममध्ये विश्‍वास या त्रिसूत्रीच्या जोरावर शहर पोलिसांचा ‘एक कुटुंब म्हणून ‘प्रेझेंस दिसू लागला आहे.

हर घर छोटा पोलीस
कोरोनावर मात करुन टीम सक्रिय होण्याने शहरातील इतर विषयावर मला लक्ष केंद्रीत करणे शक्य झाले आहे. त्यापैकी वाहातूक नियंत्रण हा पहिला विषय घेतो आहे. वरिष्ठ आधिकारी संजीवकुमार यांच्या संकल्पनेतून प्रत्येक घरातील विद्यार्थी वाहातूक दृष्ट्या सजग करण्याचा उपक्रम आहे. जेव्हा घरातील विद्यार्थी सजग होईल तेव्हा प्रत्येक कुटुंब आपोआप वाहातूकीच्या नियमाबाबत सजग होईल. विद्यार्थी निरागस असतात तसे ते प्रामाणिक असतात. तेच त्यांच्या आई-वडीलासोबत मिळून वाहातूक नियम पाळतील. नाशिकला हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवायचा असा माझा संकल्प आहे. याशिवाय गुन्हेगारी नियंत्रणाचे काही प्रयोग करणार आहे. सगळेच जाहीर करणे योग्य ठरणार नाही. परंतु एकाचवेळी शेकडो पोलीस रस्त्यावर उतरुन कमीत

कमी वेळेत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळतील असे सर्जिकल स्ट्राईक ठरावेत अशा स्वरुपाचे सरप्राईज कार्यवाहीतून गुन्हेगारी मोडून काढणार आहे, असेही आयुक्त पांडे म्हणाले.

https://scontent.fpnq7-2.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=FRmeOaUL9k8AX98Rlk0&_nc_ht=scontent.fpnq7-2.fna&oh=2e2cff7dd4324f727e5860697cb573ee&oe=5FAF8AA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com