आयुक्त दीपक पांडे म्हणाले, रात्रंदिवस झटणाऱ्या पोलिसांना सलाम!

उद्या (ता.१२) पासून सुरु होणाऱ्या लॅाकडाउनमुळे शहरातील पोलिसांवर ताण वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात थेट पोलिसांच्या गाठी- भेटी घेऊन संवाद सुरु केला आहे.
Dipak Pande
Dipak Pande

नाशिक : उद्या (ता.१२) पासून सुरु होणाऱ्या लॅाकडाउनमुळे शहरातील पोलिसांवर ताण वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात थेट पोलिसांच्या गाठी- भेटी घेऊन संवाद सुरु केला आहे. यावेळी ते म्हणाले, `रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांचा सहकारी, प्रमुख म्हणून त्यांच्या कामाला सलाम करण्यासाठी त्यांच्यात जाऊन संवाद साधतो आहे. त्यांचे मनोबल वाढवतो आहे.`

आयुक्त पांडे यावेळी म्हणाले, लॉकडाउनमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. अविश्रांत ड्युटीमुळे त्यांचा ताण वाढला आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये ड्यूटी करताना सात तर यंदा पाच पोलिस कर्मचारी शहीद झाले होते. त्यामुळे त्यांचे मनोबल खचण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून मनोबल वाढविण्यासाठी पोलिसांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्यामागे पोलिस प्रशासन खंबीरपणे उभे आहे हे दर्शविण्यासाठी पोलिसांशी संवाद साधला.

त्यांनी शिवाजी पुतळा परिसरातील चेकपोस्टवरील पोलिसांबरोबर ड्यूटी केली. पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत धीर दिला. त्यांना अधिक सक्षमपणे काम करण्याची प्रेरणा दिली.

आयुक्त पांडे म्हणाले, कोरोनाबाबतच्या नियमावलींचे नागरिक पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी, कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी-अधिकारी सध्या जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यांना सलाम करण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडा वेळ ड्यूटी केली. चहा-नाश्ता घेतला. पोलिसांना जेवण, पाणी, स्वच्छतागृह आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. मात्र, लक्षणीय घट होत नाही. ही संख्या शून्यावर आणण्यासाठी १२ पासून ते २२ मेपर्यंत कडक निर्बंध लागू होणार आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. पोलिस कर्मचारी संख्या कमी आहेत. नवीन भरती नाही. त्यातच लॉकडाउनचे काम लागले आहे. पोलिसांना आता होमगार्डची मदत मिळणार आहे. त्यामुळे हा ताण कमी होईल.

या वेळी उपायुक्त विजय खरात, संजय बारकुंड, सहआयुक्त मोहन ठाकूर, समीर शेख, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ, नाशिक रोडचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखेचे गणेश न्याहदे आदी उपस्थित होते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com