पोलिसांकडून चक्क "गुगल"चा वाढदिवस...हा "गुगल" आहे तरी कोण? - Police celebrates Google birthday...Who is this Google | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांकडून चक्क "गुगल"चा वाढदिवस...हा "गुगल" आहे तरी कोण?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

जगातील कोणतेही लोकेसन एका क्लीकवर आनले ते अमेरिकेच्या "गुगल" ने. मात्र नाशिक पोलिसांकडे देखील एक "गुगल"आहे. कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात तो पोलिसांच्या मदतीला येतो. भल्या भल्या चतुर चोरांना जेरबंद करण्यास मदत करतो.

नाशिक :  जगातील कोणतेही लोकेसन एका क्लीकवर आनले ते अमेरिकेच्या "गुगल" ने. मात्र नाशिक पोलिसांकडे देखील एक "गुगल" आहे. तो कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात पोलिसांच्या मदतीला येतो. भल्या भल्या चतुर चोरांना जेरबंद करण्यास मदत करतो. तो आहे श्वान पथकातील डॅाबरमॅन स्वान. त्याचे कौडकौतूक पोलिसांनी केले नाही, तरच नवल.   

या गुगलने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिकला प्रथमच कांस्यपदक पटकावून गौरवाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या नाशिक श्वान पथकातील डॉबरमॅन अर्थात "गुगल" या लाडक्या श्वानाचा मंगळवारी तिसरा वाढदिवस श्वान पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी "गुगल" ला वाढदिवसाची कॅप , गळ्यात फुलांची माळ घालून त्याचे कौडकौतूक करीत त्याला केक भरवण्यात आला. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी "गुगल" चे टाळ्या वाजवून स्वागत केले. 

"गुगल"  ४५ दिवसांचा असताना हैदराबाद येथील शेख बिल्डर यांच्याकडून  खरेदी करण्यात आला. त्यानंतर तो नाशिक पोलीसांच्या श्वानपथकात दाखल झाला. सुरवातीला सहा महिन्यांचे "संगोपन प्रशिक्षण" झाले. त्यानंतर त्याला नऊ महिन्यांसाठी चंदीगढ येथील "भानु"  सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देण्यात आले.  या प्रशिक्षणानंतर तो पोलिसांच्या कामगिरीसाठी सज्ज झाला.  

नुकत्याच झालेल्या  महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावून नाशिकला गौरव प्राप्त करून दिला. नाशिकच्या पोलीस श्वान पथकातील असा तो  पहिला श्वान ठरला.  "गुगल" ने आतापर्यंत ७० गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला आहे. २० गुन्ह्यात त्याची मोठी मदत झाली आहे. सात ते आठ गुन्हे उघडकीस आणण्यास तो यशस्वी ठरला. गुन्हे श्वान शोध पथकात चार, बॉम्बशोधक पथकात दोन, तर अंमली पदार्थ शोध पथकात एक असे सात श्वान कामगिरी बजावत आहे. 

तत्कालीन माजी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी डॉबरमॅन श्वनाची खरेदी करण्यात आली. त्याचवेळी सिंघल यांनी त्याच्यातील सुप्त गुण हेरून त्याचे नाव "गुगल" असे ठेवले. नुकतेच सिडकोतील एका घरफोडीत शोध लावण्यास गुगलने मोठी कामगिरी बजावल्याने सध्या तो चर्चेत आला होता. गुगलची संपूर्ण जबाबदारी श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बी.पी. मोरे, डॉग हँडलर पोलीस हवालदार गणेश कोंडे व  पोलीस हवालदार अरुण चव्हाण यांच्याकडे आहे. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख