बाराशेचे इंजेक्शन पंचवीस हजारांना विकणारा नाशिकचा डाॅक्टर अटक - Police arrest doctor doing black marketing of Redacivier inj. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

बाराशेचे इंजेक्शन पंचवीस हजारांना विकणारा नाशिकचा डाॅक्टर अटक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात याबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे. 

नाशिक : कोरोना संसर्गाच्या लाटेचा फायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांचे किस्से बाहेर येत असताना ज्या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा सुरू आहे, ते बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी फिरफिर करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी संबंधित क्रमांकावर कॉल केला. तो कट करण्यात आला. काही वेळातच संबंधितांनी कॉल केला. यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रतिइंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचे ठरले. संबंधित इंजेक्श‍न देण्यासाठी अमृतधाम परिसरात रात्र आठ ते साडेआठच्या दरम्यान आले. मात्र श्री. मोहिते यांच्याकडे अवघे १६ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील ॲक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलविले. या वेळी सद्‌गरू हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्याअगोदर श्री. मोहिते यांनी पोलिसांना घटना कळविली.

दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासमवेत असलेल्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेतले. ही बाब डॉ. मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून निघाले. दरम्यान, पोलिस गाडीही त्याच वेळी आली, त्यांनी वाहनाचा पाठलाग करीत डॉ. मुळूक यांना अडविले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना इंजेक्श‍न‍ मिळून आले. डॉ. मुळूक व तक्रारदारांना पोलिसांनी पंचवटी पोलिस ठाण्यात आणले. रात्री बारापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, डॉ. रवींद्र मुळूक हे सद्‌गुरू हॉस्पिटलचे संचालक आहेत. मात्र घटना घडली त्या दिवशी ते दवाखान्यात नव्हते असे त्यांचे सहकारी संचालक डॉ. भाबड यांनी  सांगितले.  
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स