PM Modi had use to say i had your onion and will keep respect | Sarkarnama

मोदीजी म्हणाले होते, "मैने आपकी प्याज खाई है, इस की इज्जत रखूंगा'

संपत देवगिरे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

"हम तो आप ही के यहॉं से जो आती थी प्याज, उसी पे गुजारा करते थे। जीन किसानो ने बचपन से मुझे जो प्याज खिलाई है, उन किसानो का भला करने के लिए दिल्ली मे बैठी हुई सरकार कभी कोई कमी नही रखेगी।'

नाशिक : "हम तो आप ही के यहॉं से जो आती थी प्याज, उसी पे गुजारा करते थे। जीन किसानो ने बचपन से मुझे जो प्याज खिलाई है, उन किसानो का भला करने के लिए दिल्ली मे बैठी हुई सरकार कभी कोई कमी नही रखेगी।' हे शब्द आहेत- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. 

याच शब्दांवर उपस्थित शेतकऱ्यांनी शिट्या, टाळ्यांचा गजर केला होता, मतेदेखील दिली होती. आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला, तेव्हा या सभांतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक वारंवार ऐकत त्याची चर्चा करीत आहेत, उत्तर भारतातल्या "चच्चा जी कहिन' या तकिया कलाम सारखेच! 

केंद्रात 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर जिथे जिथे निवडणुका होत, तिथे भाजपच्या सभा गाजत, त्या स्टारप्रचारक नरेंद्र मोदी यांच्याच. त्यामुळे सप्टेबर 2015 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या सभांतून मतदारांवर मोदींच्या भाषणांची मोहिनी होतीच. या वेळी झालेल्या दौऱ्यात त्यांनी दोंडाईचा येथे सभा घेतली होती. या वेळी सभेची सुरवातच त्यांनी, `हम ने तो बचपन से जो प्याज खाई है ना।, वो आपके पसीने से बनी प्याज खाई है। बस इंतजार किजिए 15 अक्तुबर का, इंतजार किजिए। अब देखिए महाराष्ट्र में भाजपा की सरकार बनते ही... 

पुढे ते कॅाग्रेस पक्षावर टिका करतात, ते म्हणतात, `इस सरकार के गलत नीतियों के कारण, मेरे कपास पैदा करनेवाले किसानो को जो नुकसान हो रहा है, मेरे प्याज की खेती करने वाले किसानो को जो नुकसान हो रहा है, उन री नितीयो को बदल दिया जाएगा,  और दिल्ली और महाराष्ट्र मिलकर के मेरे किसान बाईयो के समस्या का समाधान हम कर के रहेंगे भाईयो ।

अशी अक्षरशः सभा जिंकणारी वाक्‍ये होती, पंतप्रधान मोदींची ...आणि त्यानंतर त्यांचे खास वैशिष्ट्य असलेला उपस्थितांशी संवाद सुरू होतो. ते म्हणतात, `हमारे देश मे कहते है, अगर किसी का नमक खाते है ना, तो फिर उस नमक की इज्जत रख्खी जाती है. ""कहते है, की नही कहते है?'' उपस्थितांचा गलका...हॉ, पुन्हा "अगर किसी का नमक खाया है तो इज्जत रखनी चाहीए की नही रखी चाहीए?''. उपस्थितांचा गलका होतो "हॅा". ते पुन्हा ते विचारतात, "अगर मैने आपकी प्याज खाई है तो इसकी इज्जत रखनी चाहिए की नही रखनी चाहिए?'' उपस्थितांचा गलका होतो, "हॉ" त्यानंतर ते विचारतात, ""अगर मैने आप के कपास से बने कपडे पहने है, तो आप की इज्जत रखनी चाहिए, की नही रखनी चाहिए?'' उपस्थित आवाज देतात "हॉ'. शेवटी हा संवाद एका उंचीवर नेत ते म्हणतात, "और इस लिए मेरे भाईयो और बहनो, आप की इज्जत ये हमारी इज्जत है''  आजचे चित्र काय आहे ? यावर अन्य काही बोलण्याची गरजच नाही. 

सध्या सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन करीत आहे. मात्र स्थिती अशी की जणू त्यांना कोणी वालीच नाही. एव्हढेच काय, गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीत पिंपळगाव बसवंत हे कांदा उत्पादनाचे केंद्र असलेल्या गावात झालेल्या सभेतदेखील त्यांनी हेच मुद्दे मांडले होते. त्यामुळे या सबेची तीन मिनीटांची व्हिडिओ क्लीप चांगलीच व्हायरल होत आहे. शेतकरी, युवक सगळ्यांत तिची चांगलीच चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख