पंतप्रधान मोदींनी जातीपातीचे राजकारण संपवले  - PM Modi had Finished cast Politics | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींनी जातीपातीचे राजकारण संपवले 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

देशाला आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या योजनांची माहिती पोहचवावी. लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा.

नाशिक :  देशाला आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या योजनांची माहिती पोहचवावी. लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा असे प्रतिपादन  भाजव प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख होते. यावेळी त्या म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  विकासाच्या विविध योजना आणून अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी व्यापक प्रमाणावर काम केले. गेल्या साठ वर्षाच्या कारकीर्दीत  कांग्रेस पक्षाने  मताच्या राजकारणासाठी समाजातील विविध घटकांमध्ये जातीय तेढ निर्माण केले. कांग्रेसने फक्त खुर्चीचे राजकारण केले. पंतप्रधान मोदी यांनी कुठल्याही जातीपातीचे राजकारण केले नाही. भारतात विविध समाजाच्या लोकांमध्ये एकोपा  निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले. समाजातील विविध घटकांची आर्थिक प्रगतीसाठी अल्पसंख्याक मंत्रालयाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या प्रगती साठी आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध योजना राबविल्या. त्यातून भरीव निधी उपलब्ध करून दिला, असे त्या म्हणाल्या. 

हाजी एजाज देशमुख म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारतासाठी च्या योजनांची माहिती गरजूंना द्यावी आठढ्यातून कमीत कमी एक दिवस समाज कार्यास वाहून घ्यावे. भाजपच्या बळकटीसाठी काम करावे. अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली समजून समजातील तरुणांनी अर्धवट शिक्षण  न सोडता पदवीधर, उच्च पदवीधर असे शिक्षण घ्यावे. आर्थिक प्रगतीकडे झेप घेणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी काम करावे. तुलनेने मुस्लिम समाजात  पदवीधर शिक्षितांची संख्या अत्यल्प आहे.  तरुणांना योग्य ते मार्गदशन करून केंद्राच्या  विविध योजनांची माहिती तर द्यावी. उच्च पदस्थ नोकऱ्यांवर विराजमान कसे होतील, यासाठी अल्प संख्यांक आघाडी ने काम करावे.

यावेळी जेष्ठ नेते सुहास फरांदे, सरचिटणीस सुनील बच्छाव, सुनील केदार, अतिक खान, प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, शहबाज शेख, सलीम बागवान,  अल्पेश पारख,  विकास गुजर पगारे,  विनोद बोकडीया, नगरसेविका शाहीन मिर्झा, फिरोजभाई  शेख आदी उपस्थित होते. 
..
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख