`प्रधानमंत्री` योजनेच्या वसुलीने बोगस लाभार्थ्यांची उडाली झोप! - PM KIsan Scheme bogus payments action | Politics Marathi News - Sarkarnama

`प्रधानमंत्री` योजनेच्या वसुलीने बोगस लाभार्थ्यांची उडाली झोप!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ५६ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यामध्ये तालुक्यात एक हजार १२ बोगस लाभार्थी आढळले आहेत. यात शासकीय नोकरदार व प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. या बोगस लाभार्थ्यांकडून अनुदान वसुलीची प्रक्रीया सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे.

मालेगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ५६ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यामध्ये तालुक्यात एक हजार १२ बोगस लाभार्थी आढळले आहेत. यात शासकीय नोकरदार व प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. या बोगस लाभार्थ्यांकडून अनुदान वसुलीची प्रक्रीया सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. अन्य कारवाईची देखील या लाभार्थ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. 

योजनेच्या पोर्टलवरून ही माहिती प्राप्त झाली. बोगस लाभार्थ्यांकडून वसुली सुरू झाली असून, ९५ लाख ३८ हजार एवढी वसुली करावयाची आहे. पहिल्याच दिवशी १६ हजार रुपयांची वसुली झाल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.

बोगस लाभार्थ्यांकडून लवकरात लवकर रक्कम वसूल करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे. बोगस लाभार्थ्यांनी रक्कम न भरल्यास लाभार्थ्यांच्या सातबारा उताऱ्यावर रकमेचा बोजा लावण्यात येईल. गाव नमुना नंबर ६, फेरफार रजिस्टर उतारा व सातबारासह याबाबत अहवाल सादर केला जाईल, असे श्री. राजपूत यांनी सांगितले. तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसीलदारांवर वसुलीची जबाबदारी आहे. त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले असून, स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
एक हजार १२ लाभार्थी बोगस

केंद्राने दोन वर्षांपूर्वी किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेच्या अर्टी व शर्तीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा होत आहेत. तालुक्यात ५६ हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले. योजनेच्या पोर्टलवर मिळालेल्या माहितीवरून यातील एक हजार १२ लाभार्थी बोगस आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यावरील ९५ लाख ३८ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. संबंधित तलाठ्यांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख