पंतप्रधानांनी महाराष्ट्राला मदत टाळणे हा अन्यायच! - PM Avoid help to storm affected Maharashtra is injustice, Nasik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

पंतप्रधानांनी महाराष्ट्राला मदत टाळणे हा अन्यायच!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 मे 2021

तौक्ते वादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्राचे सारखेच नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचाच हवाई पाहणी दौरा केला. गुजरातला एक हजार कोटींची जाहीर केली. महाराष्ट्राला मात्र काहीही दिले नाही. हा अन्यायच आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.

जळगाव : तौक्ते वादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्राचे सारखेच नुकसान झाले आहे. Gujrat and Maharashtra affected same)  परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचाच हवाई पाहणी दौरा केला. गुजरातला एक हजार कोटींची जाहीर केली. (But PM declairs package to only Gujrat) महाराष्ट्राला मात्र काहीही दिले नाही. हा अन्यायच आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी (Criticize by Eknath Khadse) केली आहे.

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले. विशेषतः महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीत मोठी हानी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या वादळाच्या नुकसानीची गुजरातला जाऊन पाहणी केली. गुजरातला बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने एक हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. 

तौक्ते वादळामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीची हानी झाली. त्यांना मदत अपेक्षित आहे. केंद्र शासनाने याबाबत पुढाकार घेणे अपेक्षीत आहे. मात्र महाराष्ट्राला काहीही मदत देण्यात आली नाही. वास्तविक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास केंद्र व राज्य दोन्ही सरकारकडून मदत मिळण्याची जनतेची अपेक्षा असते. मात्र केंद्र सरकार फक्त गुजरात राज्याला मदत करीत असेल आणि महाराष्ट्राला मदत करीत नसेल तर तो महराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी श्री. खडसे यांनी केली.

केंद्राने  जादा `रेमेडीसेव्हर` द्यावेl
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. यासंद्रभात प्रशासनाने अतिशय मेहनत घेऊन विविध स्तरावर काम केले आहे. यासंदर्भात रुग्णांची संख्या विचारात घेता केंद्र शासनाच्या मगदतीचे प्रमाण अधिक हवे. विशेषतः रुग्णांसाठी रेमेडीसेव्हर इंजेक्शन पुरवठा वाढला पाहिजे. यासंदर्भात श्री खडसे म्हणाले, केंद्राने राज्याला अधिक प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा केला पाहिजे.
....
हेही वाचा...

जिल्हा परिषदेस वेठीस धरणारे `ते`कंत्राटदार कोण?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख