फडणवीस साहेब, नाशिकला दत्तक घेतलय, तेव्हा "इथे' रुग्णालय करा !

शहरातील कोरोना रुग्णांची हेळसांड सुरु आहे. त्यांच्यासाठी प्रशासनाने गैरसोयीच्या ठिकाणी रुग्णालये सुरु केली आहेत. त्यामुळे यासंदर्भात कोरोना प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी नाशिक रोडच्या भारतीय प्रतिभूती मुद्रणालयाच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करावे.
फडणवीस साहेब, नाशिकला दत्तक घेतलय, तेव्हा "इथे' रुग्णालय करा !

नाशिक : शहरातील कोरोना रुग्णांची हेळसांड सुरु आहे. त्यांच्यासाठी प्रशासनाने गैरसोयीच्या ठिकाणी रुग्णालये सुरु केली आहेत. त्यामुळे यासंदर्भात कोरोना प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी नाशिक रोडच्या भारतीय प्रतिभूती मुद्रणालयाच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करावे. मुख्यमंत्री असतांना आपण नाशिकला दत्तक घेतले होते. त्यामुळे या प्रश्‍नात लक्ष घालाच, अशी विनंती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष शशिभाई उन्हवणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी प्रसंगी केली. 

श्री. फडणवीस यांनी महापालिकेच्या बिटको रुग्णालयाला बुधवारी भेट दिली असता, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. प्रेसच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाल्यास रुग्णांसाठी प्रशासनाला चांगल्या दर्जाचे उपचार व सुविधा उपलब्ध करता येतील, असा दावा त्यांनी केला. यासंदर्भात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सुचना केल्या. 

शहरात वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. त्याला अनेक कारणे आहेत. प्रशासनाने सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जी नवी रुग्णालये निश्‍चित केली आहेत, ती रहिवासी क्षेत्रात आणि वर्दळीच्या ठिकाणी आहेत. रहिवासी झोनमधील या रुग्णालयांमुळे सामान्य नागरिकांनाही कोरोना संसर्गाची भिती निर्माण झाली आहे. त्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही. कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेचे सध्याचे स्वरुप लक्षात घेता प्रशासनाने त्यांना पुर्णतः स्वतःच्या जबाबदारीवर सोडले आहे. हे योग्य नाही. सध्याच्या कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेसाठी विविध चांगले पर्याय आहेत. केंद्र शासनाच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या रुग्णालयाचा त्यासाठी वापर करता येईल. या रग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यात पाचशे रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे या मागणीचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी केली. 

या शहराने भारतीय जनता पक्षाला तीन आमदार दिले आहेत. महापालिकेत देखील भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे नागीरकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला जावा. त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. यावेळी श्री. फडणवीस यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. रुग्णालयाचा पर्याय योग्य असल्यास स्विकारावा अशी सुचना देऊन संबंधीत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त केले. यावेळी मुरलीधर घोरपडे, नवनाथ कातकाडे, रवि पगारे, हरीभाऊ जाधव, विलास गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=EbhnMwHhfCsAX8JZgEO&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=17445e9e403014da9cb2844c5b584cab&oe=5F2D0627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com