नाशिककर म्हणाले, राज ठाकरेंचा वाढदिवस रोज साजरा होवो! - People said, Every day should Raj Thakre birthday celibration, Nashik Politics. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

नाशिककर म्हणाले, राज ठाकरेंचा वाढदिवस रोज साजरा होवो!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

आज नाशिक शहरात गंमत घडली. शहरातील जे. आर. मेहता या पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर चक्क पन्नास रुपये झाले होते. त्यामुळे जे नाशिककर तेथे पेट्रोल भरायाल गेले, त्यांना अक्षरशः लाख रुपयाची लॅाटरी लागल्याचे समाधान मिळाले. कारणही तसेच होते, त्यांना पन्नास रुपये लिटर दराने पेट्रोल मिळत होते.

नाशिक : आज नाशिक शहरात गंमत घडली. शहरातील जे. आर. मेहता या पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर चक्क पन्नास रुपये झाले होते. (Nashik`s some people today shocked with petrol price was 50 Rs litter) त्यामुळे जे नाशिककर तेथे पेट्रोल भरायाल गेले, त्यांना अक्षरशः लाख रुपयाची लॅाटरी (There feeling like winer of lottery) लागल्याचे समाधान मिळाले. कारणही तसेच होते, त्यांना पन्नास रुपये लिटर दराने पेट्रोल मिळत होते. 

शहरातील मनसेतर्फे आज राज ठाकरे (MNS Suprimo Raj Thakre) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम झाले. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो स्वस्त पेट्रोलचा. सकाळी नऊ ते दाह या कालावधीत. जे जे ग्राहक पेट्रोल खरेदीसाठी आले, त्यांना शुभेच्छा देत, आज राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने आम्ही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल पन्नास रुपये दराने देणार आहोत. ५३ वा वाढदिवस असल्याने ५३ रुपये सुट देण्यात आली. त्यामुळे पेट्रोल घेताना या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद होता.  

मध्यंतरी कॅांग्रेस नेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारच्या महागाई विरोधातील धोरणावर टिका करताना एक विनोदी ट्वीट केले होते. ते म्हणाले, `लवकरच पेट्रोल साठ रुपये....पण अर्धा लिटर` या विनोदाला साजेसा प्रकार आज शहरात प्रत्यक्ष घडला.फक्त त्याच्या उलट. निमित्त ठरले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस.

यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले, आम्ही दरवर्षी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला जातो. मात्र यंदा कोरोना असल्याने कोणीही येऊ नये असा निरोप होता. त्यामुळे राज ठाकरेंच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही ५३ रुपये सुट दिली. दिड तासात ५३० ग्राहकांना त्यांनी पन्नास रुपये दराने पेट्रोल दिले. या सर्वच ग्राहकांच्या मनात कदाचीत, राज ठाकरे यांचा वाढदिवस रोज येवो. तो दिवस केव्हा येईल अशा भवना होत्या. 

श्री. दातीर यांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम झाला. यावेळी अंकुश पवार, श्याम गोहाड, विजय आगळे, पंकज बच्छाव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

एकनाथ खडसे म्हणाले, `पायी वारी व्हायला हवी होती!`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख