''पंकजाताई, भाजप सोडा, शिवसेनेत प्रवेश करा'' सोशल मीडियावर मोहीम 

पंकजा मुंडे यांच्यावर भाजप अन्याय करीत आहे.
''पंकजाताई, भाजप सोडा, शिवसेनेत प्रवेश करा'' सोशल मीडियावर मोहीम 
4Sarkarnama_20Banner_20_202021_06_03T162450.884.jpg

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे  Pankaja Munde यांच्यावर भारतीय जनता पक्ष अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाज बांधवांची आहे. त्यामुळे या पक्षाचा त्यांनी तातडीने त्याग करून ताबडतोब शिवसेनेत प्रवेश करावा असे आवाहन वंजारी समाज करीत आहे. वंजारी समाज भारतीय जनता पक्षाचा निषेध करीत आहे. पंकजाताई यांनी आता भारतीय जनता पक्षात bjp न राहता शिवसेनेत Shiv Sena प्रवेश करावा, त्या ठिकाणी त्यांचा योग्य सन्मान होईल, असे महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाधक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.

या साठी युवकांच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोहीम राबविण्यात येत आहे. ''पंकजाताई भारतीय जनता पक्ष सोडा, शिवसेनेत प्रवेश करा,'' अशी मोहीम सध्या वंजारी सेवा संघातर्फे सोशल मीडियावर चालविण्यात येत आहे.  

महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाधक्ष प्रशांत नाईक म्हणाले की, भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी कष्ट केले,मात्र आज त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्यावर पक्ष अन्याय करीत आहे,त्यांना पक्षाने सन्मानाने विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त करण्याची गरज होती, मात्र त्यांचा तो सन्मान करण्यात आला नाही, त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या यादीत नाव होते ऐनवेळी  त्यांचे नाव रद्द करण्यात आले. 

शिवसेनेचं अखेर ठरलं! स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा!
''पक्षातर्फे त्यांच्यावर हेतुपुरस्सर अन्याय करण्यात येत आहे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही पक्षाने अशीच वागणूक दिली, त्या मुळे ते पक्षातून बाहेर  पडले. आता त्याच पद्धतीने पंकजाताई यांना भाजप वागणूक देत आहे. वंजारी समाज भारतीय जनता पक्षाचा निषेध करीत आहे. पंकजाताई यांनी आता भारतीय जनता पक्षात न राहता शिवसेनेत प्रवेश करावा,त्या ठिकाणी त्यांचा योग्य सन्मान होईल अशी मागणीही आम्ही करीत आहोत. यासाठी समाजातील युवक सोशल मीडियावर मोहीम राबवित आहे,'' असे नाईक यांनी सांगितले.  

फोन टॅप करण्याची परवानगी राज्य सरकारनेच दिली  
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला Rashmi Shukla वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court सुनावणी झाली. या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहेत. रश्मी शुक्ला यांची बाजू ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मांडली. 
Edited by : Mangesh Mahale 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in