पंचवटीकरांनो "अब पछताये होत क्‍या, जब चिडियॉं चुग गई खेत' - Panchwati, Nashik East is most corona affected in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

पंचवटीकरांनो "अब पछताये होत क्‍या, जब चिडियॉं चुग गई खेत'

संपत देवगिरे
रविवार, 5 जुलै 2020

पंचवटी ही शहराची मंत्रभूमी, गोदावरी आणि मंदिरांचे शहर. जुने नाशिक म्हणजे मुळ नाशिककरांचे वास्तव्य, राजकीय नेते, आमदार महापालिका पदाधिकारी असलेला भाग. या परिसराचा उल्लेख सध्या "कोरोना' नगरी कारावा अशी स्थिती आहे. 

नाशिक : पंचवटी ही शहराची मंत्रभूमी, मंदिरांचे शहर जुने नाशिक म्हणजे मुळ नाशिककरांचे वास्तव्य, राजकीय नेते, आमदार महापालिका पदाधिकारी असलेला भाग. या परिसराचा उल्लेख सध्या "कोरोना' नगरी कारावा अशी स्थिती आहे.

कोरोनाग्रसत असा नाशिक शहराचा उल्लेख होतो, सत्तर टक्के रुग्ण या भागातील आहे. येथील काही भागात जवळपास प्रत्येक घरात येथे रुग्ण आहेत. अशा स्थितीत ज्यांनी पुढे येऊन दिलासा द्यावा, ते नगरसेवक, लोकप्रतिनिधीच भयभीत आहेत. त्यामुळे या मंत्रभूमीला कोणता मंत्र उपयोगी ठरणार याचा शोध सुरु आहे. 

शहरात आतापर्यंत दोन हजार 780 रुग्ण आढळले आहेत. यातील एक हजार 414 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. एक हजार 239 जणांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या कोविड 19 डॅशबोर्डनुसार पंचवटीत 780 व नाशिक पूर्वला 897 असे एक हजार 677 म्हणजेच साठ टक्के रुग्ण या भागात आहेत. काळजीचे कारण येथील अर्थव्यवस्था शेतमालाची विक्री व धार्मिकतेभोवती गुंफलेली आहे. लॅाकडाउन असले तरीही तरीही ग्रामीण भगातून नागरीक विधी करण्यासाठी येतच होते. हे कर्मकांड पूर्णतः बंद नव्हते. अनेकांनी संयम सोडला होता. 

नाशिक बाजार समिती याच भागात आहे. लॅाकडाउनच्या काळात देखील येथून दररोज अत्यावश्‍यक सेवा म्हणून तीस ते पस्तीस ट्रक भाजीपाला मुंबईला जा-ये करत होते. बाजार समितीत मार्चमध्ये पहिला रुग्ण भाजीपाल्याचा व्यापारी, त्यानंतर चालक, हॉटेलचालक व पुढे मजुरी करणारा असा त्याचा प्रसार होत गेला. बाजार समितीच्या सभोवती फुले नगर, वडारवाडी, भराडवाडी, राहूलवाडी, गौंडवाडी या दाट वस्तीत कोरोनाचा संसर्ग वेगाने झाला. अत्यंत दाट वस्ती असलेल्या या भागात घरात पाच व्यक्ती असतील तर त्यातील दोन कोरोनाबाधीत आहेत. शहरातील कोरोनाचा ट्रेंड म्हणजे, 43 टक्के महिला व 57 टक्के पुरुष बाधीत आहेत. 21 ते 40 या वयोगटातील 999, 41 ते 60 वयोगटातील 759 रुग्ण आहेत. ही संख्या बोलकी आहे. आता हा सर्व परिसर बंद करण्यात आला आहे. घरोघर शोध मोहीम राबविली जात आहे. उपचार केले जात आहेत. मात्र पुन्हा तेच झाले, "अब पछताये होत क्‍या जब चिडियॉं चुग गई खेत'. 

शहराबरोबरच अन्य तालुक्‍यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरताना दिसत आहे. विशेषतः दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी व नाशिकचा ग्रामीण भगात येथून मोठ्या प्रमाणात सेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतात. त्या संपर्कातून या भागातील संसर्ग या तालुक्‍यांतही झाला असा, अशी शंका आहे. काल दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक 196 रुग्ण होते. उर्वरित रुग्णांमध्ये सिन्नर तालुक्‍यातील 29, मालेगावचे दहा व अन्य ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 819 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दोन हजार 98 बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील हिरावाडीमधील 67 वर्षीय वृद्ध, 55 वर्षीय पुरुष, तसेच सिडकोमधील 35 वर्षीय महिला, मखमलाबाद रोडवरील 40 वर्षीय पुरुषाचा आणि नानावलीतील 60 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 127 वर पोचली. तर, येवल्यातील 78 वर्षीय वृद्ध, मालेगाव तालुक्‍यातील 79 वर्षीय वृद्ध आणि सिन्नरमधील शिवडे येथील 75 वर्षीय वृद्धेचाही मृत्यू झाला. ग्रामीण भागातील मृतांची संख्या 54 झाली आहे. 
...  
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख