नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती ; २२ रुग्णांचा मृत्यू.. दोषींवर कारवाई करणार : राजेंद्र शिंगणे

अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sarkarnama Banner (73).jpg
Sarkarnama Banner (73).jpg

नाशिक :  झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.

नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. या पुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन या सध्या कोविच्या रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या नव्या टाकीला गळती लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात २२ रुग्णांचे निधन झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले आहे. 

  
या रुग्णालयात शंभरहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु होते. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असल्याने लिकेजमुळे ऑक्सीजनचा पुरवठा खंडीत झाला. त्यातऑक्सिजनवर असलेले २२ रुग्ण दगावले आहेत. काही  रुग्ण गंभीर आहेत. त्यामुळे एकच धावपळ उडाली आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने मदतकार्य व दवाखान्याच्या कामकाजात अडथळे येत होते.  

आज सकाळी अकराला गॅस रिफीलींग करताना हा प्रकार घडला. येथे शंभऱहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी येथे नव्याने सिलेंटर बसविण्यात आला होता. आज सकाळी त्यात फिलींग करतांना गॅस गळती झाली. त्यामुळे धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून येथील डॅाक्टर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्यत्र हलविण्यात येत आहे. त्यानुसार विविध रुग्णवाहिकांतून रुग्ण हलविण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. गळतीचे कारण व नेमकी त्रुटी स्पष्ट झालेली नाही. 
Edited by: : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com