जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट - Oxigen plant in All Government hospitals, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑत्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. 

याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आता उर्वरित सर्व शासकीय रुग्णालयांत देखील ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी करावी असे आदेश पालकमंत्री  भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले आहेत.

पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांतून गेल्या आठवड्यातच पहिल्या टप्प्यातील ९ रुग्णालयांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १०.८८ कोटी रुपयांच्या अत्यावश्यक प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून ४ ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर मधून दोन ठिकाणी प्रकल्प उभारले जातील. त्यानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित १६ रुग्णालयांत देखील लवकरच स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन जिल्ह्यातील सर्व ३१ शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन उफलब्धतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण व चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तसेच सिन्नर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात हे प्लांट कार्यान्वित होतील. केंद्र सरकारकडून नांदगाव, दाभाडी, पेठ, सुरगाणा या चार ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर येथे ऑक्सिजन प्लांट निर्माण होणार आहे.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख