अन्यथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू!

दोन दिवसांपूर्वी तालुक्यासह जिल्ह्यातील ठेकेदारांचे रजिस्ट्रेशन आदिवासी विकास विभागाने जमा करून घेतले. पेन ड्राइव्हमध्ये डिजिटल सिग्नेचर, डिजिटल सर्टिफिकेट, की बोर्ड असे कागदपत्र जमा करून घेतले. आता त्यावरून प्रशासनाकडून गोंधळ सुरु आहे.
अन्यथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू!
Bharat Gavit

नवापूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यासह जिल्ह्यातील ठेकेदारांचे रजिस्ट्रेशन आदिवासी विकास विभागाने जमा करून घेतले. (TDC had collect contractors registration) पेन ड्राइव्हमध्ये डिजिटल सिग्नेचर, डिजिटल सर्टिफिकेट, की बोर्ड असे कागदपत्र जमा करून घेतले. (They collected digital documents) आता त्यावरून प्रशासनाकडून गोंधळ सुरु आहे, (Now administration themselve confused) अशी तक्रार भाजप नेते भऱत गावित (BJP leader Bharat Gavit) यांनी केली आहे.  

यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आदिवासी विकास विभागाच्या विकासकामांची निविदा स्वतः अपलोड करू, आम्हीच आमच्या मर्जीने निविदा भरू, एजन्सीचे काम आम्हीच करू, या पद्धतीने मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करीत सर्व ठेकेदारांना कागदपत्रे परत करून निविदा भरण्याचा अधिकार द्यावा, अन्यथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आदिवासी विकास विभागाची नोटीस क्रमांक अकरानुसार निविदा निघाली आहे. नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यातील विविध कामांची निविदा भरण्यासाठी १५ सप्टेंबरअखेर मुदत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ज्या लोकांनी नोंदणीकृत रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांना निविदा भरण्याची अट टाकली आहे.

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ठेकेदारांनी रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना रजिस्ट्रेशन दिलेले नाही. ज्यांच्याजवळ रजिस्ट्रेशन आहे, त्यांचे डॉक्युमेंट दोन दिवसांपासून जमा करून घेतले आहेत. आदिवासी विकास विभाग विशिष्ट मर्जीतल्या ठेकेदारांना काम देऊ इच्छित असल्याचा आरोपही गावित यांनी केला. दरम्यान, याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.  
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in