संत मुक्ताबाई पालखी संयोजक शासनाच्या निर्णयाशी सहमत - Organiser of Muktai Palkhi are agrees with Government restriction, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

संत मुक्ताबाई पालखी संयोजक शासनाच्या निर्णयाशी सहमत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

तापी तीरावरील श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून भीमातीरावरील विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीस महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी- मुक्ताईनगर येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत ही पालखी निघेल. यंदाची वारीदेखील बसद्वारे निघणार आहे.

मुक्ताईनगर : तापी तीरावरील श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर (Muktainagar wari will proceed today to Pandharpur) येथून भीमातीरावरील विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीस महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मानाच्या दहा पालख्यांपैकी (All Ten palkhis will travel by bus Bor Ashadhi) प्रथम निघणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी- मुक्ताईनगर येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत ही पालखी निघेल. यंदाची वारीदेखील बसद्वारे निघणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन राज्य शासनावर टिका केली होती. हा निर्णय म्हणजे मुघलांच्या निर्णयासारखी असल्याचे म्हटले होते. मात्र वारकऱी व पालखी संयोजकांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे समर्थन केल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर खजिल होण्याची वेळ आली आहे. 

शेकडो वर्षांपासून आदिशक्ती मुक्ताबाई पालखीसोबत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची परंपरा असून, मध्य प्रदेश, खानदेश, विदर्भातील भाविक दिंड्यासह या सोहळ्यात सहभागी होत असतात. सुमारे सातशे किलोमीटर अंतर ३३ दिवसांत ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता ही पालखी पूर्ण करते. पिढ्यान्पिढ्या ही वारी सुरू आहे. मात्र, मागील वर्षापासून या वारीला कोरोनाची दृष्ट लागली असून, शासनाकडून जनतेच्या हितासाठी निर्बंध घातल्याने वारी पायी न जाता बसने होत आहे.

या वर्षीही कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे शासनाने वारकऱ्यांच्या प्रमाणभूत संतांच्या दहा मानाच्या पालख्यांना मान्यता दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई संस्थान कोथळी (मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताबाई पालखीचा समावेश असून, या पालखीचे परंपरेनुसार प्रस्थान होत असते. त्याप्रमाणेच सोमवारी जुने मुक्ताबाई मंदिरात सकाळी अकराला मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ पंढरपूरचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, पालखी सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे, तहसीलदार श्वेताताई संचेती, पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांची उपस्थिती राहील.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
सोशल मीडियाद्वारे प्रस्थान सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण करण्यात येणार असून, भाविकांनी घरबसल्या सोहळा प्रस्थान कार्यक्रमात सहभाग घ्यावा. कुणीही कोथळी येथे येऊ नये, असे आवाहन मुक्ताबाई संस्थानकडून केले आहे. पालखी प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम नवीन मुक्ताबाई मंदिरात राहील. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील.

कोरोनामुळे जनतेचे आरोग्यहित लक्षात घेऊन राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयास आमचे समर्थन आहे. पालखी मार्गात गावोगाव हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात. गर्दीने संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाकडून जनतेचे आरोग्यहित लक्षात घेऊन जबाबदारीने घेतलेल्या निर्णयाचे जबाबदार संस्थान म्हणून बसद्वारे वारीचे समर्थन करीत आहोत.
-रवींद्र पाटील, अध्यक्ष, संत मुक्ताबाई संस्थान, कोथळी-मुक्ताईनगर.
... 
हेही वाचा...

कृषिमंत्री दादा भुसेंनी केली खरीपाची पेरणी!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख