राज्याच्या सीमावर्ती भागात मुक्त विद्यापीठाचा विस्तार 

राज्याच्या सीमावर्ती भागात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विस्तार होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर गोवा आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात चंदगड, तुमडी आणि म्हैसाळ येथे विद्यापीठाचे केंद्र सुरू होणार.
Uday Samant
Uday Samant

नाशिक : राज्याच्या सीमावर्ती भागात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विस्तार होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर गोवा आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात चंदगड, तुमडी आणि म्हैसाळ येथे विद्यापीठाचे केंद्र सुरू होणार असल्याने राज्याबाहेरील मराठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

मुक्त विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या जागेची पाहणी करण्यासाठी श्री. सामंत नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यापीठाच्या अडचणीच्या अनुषंगाने बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. श्री. सामंत म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या फेब्रुवारीत नाशिकला उपकेंद्रासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र मध्यंतरी लॉकडाउनमुळे रखडलेल्या उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली आहे. त्यात, ग्रामस्थांच्या रस्त्याची अडचण होती. त्याबाबत रस्त्याचे आश्‍वासन दिल्याने बाधितांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. निविदेसह इतर प्रक्रिया पूर्ण करीत येत्या १५ एप्रिलपासून नाशिकच्या उपकेंद्राच्या कामकाजाला सुरवात होईल. साधारण दोन कोटी रुपये खर्चाच्या इमारत बांधकामाचा हा विषय दीड वर्षात मार्गी लागेल. 

दरम्यान, मुक्त विद्यापीठाचा राज्याच्या बाहेर विस्तार करण्याचे बैठकीत ठरले. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. पुढच्या टप्प्यात दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आदी शहरांत मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरू होतील. याशिवाय रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड येथील उपकेंद्राला सुरवात होईल. त्यानंतर पदवीपर्यंतच नव्हे, तर किमान कौशल्यविषयक कोर्स सुरू होतील. नागपूरला साडेपाच कोटी रुपये खर्चून मुक्त विद्यापीठाचा विस्तार केला जाणार आहे. तेथे नवीन इमारतीसह विस्तार होईल. 

कृषी पदवी अभ्यासक्रम
यूजीसीच्या मान्यतेअभावी देशातील विविध विद्यापीठांचे कृषी अभ्यासक्रमाची पदवी अभ्यास बंद आहेत. मात्र, मुक्त विद्यापीठातर्फे बीएस्सी ॲग्रिकल्चरच्या पदवीची सोय करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन हे शिक्षण सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
-- 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com