कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता १५०० टन करावी - onion storage capacity shall bi ncrease up to 1500 Tonne | Politics Marathi News - Sarkarnama

कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता १५०० टन करावी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा २५ टनावरून १५०० टन एवढी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नाशिक : कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा २५ टनावरून १५०० टन एवढी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण  मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवले आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारेन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कांदा व्यापारी व शेतकरी यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाने २९ ऑक्टोबरला दिलेल्या सुचनेप्रमाणे बाजार समित्यांत कांदा खरेदीच्या तारखेपासून ग्रेडींग/ पॅकेजिंगसाठी ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खुप कमी असून तो सात दिवसांचा करावा. 

केंद्र शासनाने २३ ऑक्टोबर २०२० ला जीवनावश्यक वस्तु कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा केली. त्यात घाऊक व्यापाऱ्यांसाठी २५ टन तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी फक्त २ टनापर्यंत साठवणूकचे निर्बंध घातले. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र रब्बी कांदा उत्पादनात देशातील अग्रगण्य राज्य आहे. ३३ टक्के कांदा उत्पादन महाराष्ट्रात होते. देशाच्या कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा ८० टक्के आहे. मागील हंगामात रब्बी  हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे अंदाजे १०० लाख टन कांदा उत्पादन झाले आहे.
कांद्याचे नुकसान

मागील काही वर्षात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. असे असले तरी मागील रब्बी हंगामाच्या साठवलेल्या कांद्याचे ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले आहे.  केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तु कायद्यातील  नियंत्रण आदेशात सुधारणा करून कांदा साठवणूकची मर्यादा घाऊक व्यापाऱ्यांकरिता २५ मे.टन एवढी कमी केल्याने एपीएमसीमधील कांदा व्यापारी जे शेतकऱ्यांकडूनथेट कांदा खरेदी करत होते यावर परिणाम झाला. त्यांच्याकडून कांदा साठवणूकीची ही मर्यादा १५०० टनापर्यंत वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. २३ ऑक्टोबर २०२० च्या नोटिफिकेशनद्वारे कांद्याच्या आयातीला स्टॉक मर्यादेतून सूट देण्यात आली आहे.  त्याच धर्तीवर एपीएमसीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक मर्यादा १५०० मे.टनापर्यंत वाढवावी अशी मागणी कांदा व्यापाऱ्यांकडुन होत आहे. त्यानुसार केंद्र शासनाने त्याची दखल घेऊन संबंधीत बदल करावेत.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख