ज्येष्ठ नेते शरद पवार नाशिकच्या कांदा उत्पादकांचे अश्रृ पुसणार ! - Onion Growers will meet Sharad Pawar Tommarow | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

ज्येष्ठ नेते शरद पवार नाशिकच्या कांदा उत्पादकांचे अश्रृ पुसणार !

संपत देवगिरे
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

गेल्या महिनाभरात कांदा उत्पादक शेतकरी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे दुस-यांदा अडचणीत आला आहे. एकीकडे कृषी बील आणले, दुसरीकडे निर्यातबंदी आणि साठा मर्यादेचे आदेश काढल्याने नाशिक जिल्हा अशांत बनला आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

नाशिक : गेल्या महिनाभरात कांदा उत्पादक शेतकरी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे दुस-यांदा अडचणीत आला आहे. एकीकडे कृषी बील आणले, दुसरीकडे निर्यातबंदी आणि साठा मर्यादेचे आदेश काढल्याने नाशिक जिल्हा अशांत बनला आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या (ता. २८) नाशिक दौ-यावर येत आहे. ज्येष्ठ नेते (कै) विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. मात्र सध्या कांदा प्रश्नावर जिल्ह्यात शेतकरी त्रस्त आहेत. सगळीकडे असंतोष आहे. त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेससह विविध शेतकरी संघटनाही या प्रश्नावर आंदोलनाचे इशारे देत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार कांदा उत्पादक शेतकरी तसेच कांदा प्रश्नाशी संबंधीत कार्यकर्ते व पदाधिका-यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाकडून दिवसभर चाचपणी सुरु होती. त्यासाठी लासलगाव येथील बाजार समितीचे पदाधिकारी, कांदा व्यापारी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी श्री. पवार चर्चा करतील. 

दरम्यान उद्या मंत्रीमंडळाची बैठक आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांना मुंबईत थांबावे लागेल. माजी खासदार समीर भुजबळ, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार आदी या दौ-याचे नियोजन करीत आहेत. 
...
 

https://scontent.fnag4-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख