चर्चा केली अनामिकाशी ....नाव सांगतिले कृषीमंत्री दादा भुसेंचे !

कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर काल नाशिकमध्ये आंदोलन झाले. नाव होते, फोन आंदोलन. यामध्ये एका नेत्यांची कृषीमंत्र्यांशी संवाद ही क्लिप दिवसभर व्हायरल झाली. शोध घेतल्यावर कळले, बोलणारी व्यक्ती कृषीमंत्री नव्हतीच. कोण होते, हे देखील अद्याप समजलेले नाही.
चर्चा केली अनामिकाशी ....नाव सांगतिले कृषीमंत्री दादा भुसेंचे !

नाशिक : कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर काल नाशिकमध्ये आंदोलन झाले. नाव होते, फोन आंदोलन. यामध्ये कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना फोन करुन कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधले. मात्र यामध्ये एका नेत्यांची कृषीमंत्र्यांशी संवाद ही क्लिप दिवसभर व्हायरल झाली. शोध घेतल्यावर कळले, बोलणारी व्यक्ती कृषीमंत्री नव्हतीच. कोण होते, हे देखील अद्याप समजलेले नाही. त्यामुळे या आंदोलनांची चांगलीच चर्चा झाली.   

कांदा प्रश्‍नावर आंदोलन झाले नाही, असा महिना नसतो, वर्षही जात नाही. कारण जगातील कांदा उत्पादकांपैकी प्रमुख क्षेत्र म्हणून नाशिकचा उल्लेख होतो. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव नाशिकमध्येच आहे. त्यामुळे कांदा आणि आंदोलन हे एक समिकरण झाले आहे. काल असेच एक आंदोलन झाले, त्याचे नाव फोन आंदोलन. जमेल त्याने लोकप्रतिनिधींना फोन करायचा. त्यासाठी या संघटनेच्या नेत्याने फोन केला. त्याची क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल केली. त्याचे शिर्षक होते, कांदा प्रश्‍नी कृषीमंत्र्यांशी फोनवर चर्चा. प्रत्यक्षात ना तो फोन कृषीमंत्र्यांकडे होता, ना कृषीमंत्री बोलत होते. त्यामुळे हे आंदोलन खरोखर कांदा प्रश्‍नासाठी होते, की प्रसिद्धीसाठी याची चर्चा मात्र रंगली.

या आंदोलनासाठी कांदा उत्पादनखर्च दहा ते बारा रुपये किलो आहे. मात्र सध्या शेतक-याला केवळ पाच ते सात रुपये किलो दर मिळतो. प्रत्यक्ष बाजारात कांदा सरासरी वीस रुपये किरकोळ दराने विक्री होत आहे. एव्हढी दरवाढ कशामुळे होते. हे मधले लोक काय करतात, की त्याचे दर एव्हढे वाढतात. सामान्य ग्राहकाला चढ्या दारेन कांदा विक्री होतो. मात्र कांदा उत्पादकांच्या हाती काहीच पडत नाही. याचा जाब विचारण्यासाठी काल कांदा दर प्रश्‍नी फोन आंदोलन झाले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले. यासंदर्भात या आंदोलनाचे पदाधिकारी कुबेर जाधव यांनी एक फोनवरील संभाषणाची क्लिप व्हायरल केली.दिवसभर सोशल मिडीयावर ही क्लिप व्हाटस्ॲप, फेसबूक आणि विविध माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यासंदर्भात मंत्र्याच्या आवाजासंदर्भात संशय आल्याने कृषीमंत्र्यांशी संपर्क केल्यावर त्यांना यासंदर्भात काहीही माहिती नव्हती. माझ्याशी कोणाचाही संप्रक झाला नाही. शेतकरी व कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांसाठी आपण सदैव उपलब्ध असतो. कोणीही शेतकरी आला, तरीही मी त्यांना आवर्जुन भेटतो, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर बराच प्रयत्न करुनही ही क्लिप कोणाची हे स्पष्टीकरण झाले नाही. त्यामुळे या आंदोलनाची काय साध्य झाले, यापेक्षा कृषीमंत्री यांच्याशी न झालेली चर्चा व्हायरल झाली, दिवसभर ती विविध माध्यमांतून फिरत होती, याचीची चर्चा अधिक झाली.

कांदा पीकाला किमान वीस रुपये क्वींटल दर मिळावा. त्यासाठी दर कमी झाल्यास उत्पादन खर्च वसुल व्हावा यासाठी शेतक-याला किमान पाचशे रुपये प्रती क्विंटल अनुदान मिळावे या प्रमुख मागण्या होत्या. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांशीही संपर्क केला. मात्र त्यांच्याशीही संपर्क झाला नाही. खासदारांनी यासंदर्भात राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे, असे सांगितले. त्यामुळे कांदा फोन आंदोलन चर्चेत आले, मात्र ते न झालेल्या फोनवरील संवादासाठी.
...
कृषीमंत्र्यांना दुरध्वनी केला होता. मात्र समोरच्या व्यक्तींनी आमचे बोलणे झाले. मात्र समोर कोण बोलत आहेत, हे आम्हाला समजले नाही. संबंधीत व्यक्तींनीही कृषीमंत्री आहोत, की कोण हे समजले नाही. मात्र आमचा हेतु कांदा उत्पादकांना न्याय मिळावा हाच आहे. 
- कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
.....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=UVm7B5LNKQAAX8m8y85&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=19513a14cc3a13dbaf7e964d5a865a9d&oe=5F44C127

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com