राज्यातील सहकारात खांदेपालट; नाशिक, पुणे, मुंबईत बदल्या 

मुख्य कार्यकारी संचालक एस. बी. खरे यांची आज नाशिकचे जिल्हा सहकार उपनिबंधकपदी बदली झाली. त्यांच्यासह राज्यातील सहकार विभागाच्या अकरा वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील सहकारात खांदेपालट; नाशिक, पुणे, मुंबईत बदल्या 

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत प्रतिनियुक्तीवर असलेले मुख्य कार्यकारी संचालक एस. बी. खरे यांची आज नाशिकचे जिल्हा सहकार उपनिबंधकपदी बदली झाली.  त्यांच्यासह राज्यातील सहकार विभागाच्या अकरा वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 आर्थिक संकटात असलेल्या नाशिक जिल्हा बॅंकेत गेली दोन वर्षे श्री. खरे कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी बॅंकेच्या आर्थिक परिस्थितीत सुधार करण्याचे प्रयत्न केले. आज राज्य शासनाने सहकार विभागात खांदेपालट केली आहे. नाशिक, पुणे, मुंबई व नांदेडला नव्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. सहकार अवर सचिव मं. ग. जोशी यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत.  

सध्या प्रतीनियुक्तीवर असलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. खरे यांची नाशिक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक गौतम बलसाणे यांची नाशिकचे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे. आज सकाळी श्री. खरे यांनी जिल्हा बॅंकेचा कार्यभार संबंधीत अधिकाऱ्यांना सुपुर्त केला. नाशिकचे जिल्हा उपनिबंधक म्हणून ते लगेचच सुत्रे स्विकारणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. यावेळी श्री. खरे यांनी गेले दोन वर्षे बॅंकेच्या कामकाजाला गती दिली. तसेच विविध स्तरावर बॅंकेला अडचणींतून मार्ग काढण्यास मदत केल्याबद्दल बॅंकेच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव, हेमंत गोसावी प्रदिप शेवाळे यांनी त्यांना गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते सध्या घरीच क्वारंटाईन आहेत. त्यामुळे ते बॅंकेत उपस्थित नव्हते. 

औरंगाबादचे विभागीय उपनिबंधक यांची मुंबई (2) येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था म्हणून बदली झाली आहे. पुण्याचे सहकार उपनिबंधक, जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन यांची नाशिकला आदिवासी विकास विभागात उपनिबंधक सहकारी संस्था येथे बदली झाली आहे. पुणे येथील सहकार मुख्यालयातील सहकार उपनिबंधक एम. पी. सोबले यांची पुणे ग्रामीण सहकार उपनिबंधक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या आर-एन विभागातील सहकार उपनिबंधक सं. वि. निकम यांची मुंबईतील एल विभागातील सहकार उपनिबंधक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील सहकार उपनिबंधक सं. सु. बिडवई यांची जळगावचे जिल्हा सहकार उपनिबंधक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे जिल्हा सहकार उपनिबंधक पी. एस. सोनावणे यांची मुंबईत म्हाडा येथे सहकार उप निबंधकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील गौ. शं. कांबळे (वर्धन) सहकार उपनिबंधक (मत्स्य) यांची मुंबईत एच-पश्‍चिम विभागाचे सहकार उपनिबंधक पदी नियुक्ती झाली आहे. पुण्याच्या सहकार विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक (प्रकल्प) अमोल यादव यांची नांदेडचे जिल्हा सहकार उपनिबंधक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे (ग्रामी) जिल्हा सहकार उपनिबंधक डॉ. ए. एन. कुंभार यांची मुंबईत सहकार उपनिबंधक (टी. विभाग) येथे बदली करण्यात आली आहे. 
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=3a1d891f4eb11eec9bda32c8a212f221&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com