दिवाळीनंतर उर्जामंत्र्यांचा एकलहरे दौरा, तिसरा संच सोमवारी सुरु होणार - NTPS 3 NO set will starts tommaroe for a week | Politics Marathi News - Sarkarnama

दिवाळीनंतर उर्जामंत्र्यांचा एकलहरे दौरा, तिसरा संच सोमवारी सुरु होणार

नीलेश छाजेड
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्र गुजरात दरम्यान वीज वहन करणाऱ्या लाईन चे दुरुस्तीसाठी परमिट घेण्यात आले आहे. त्यामुळे ग्रीड स्टेबिलिटी साठी नाशिकचा आणखी एक संच सुरू करण्याचे निर्देश देण्यात  आले आहेत.

एकलहरे, ता. ८ : गुजरात मधील नवसारी वीज वहन करणाऱ्या पारेषणच्या लाईन मध्ये दुरुस्तीचे  काम निघाल्याने नाशिक औष्णिक वीज केंद्राचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र गुजरात दरम्यान वीज वहन करणाऱ्या लाईन चे दुरुस्तीसाठी परमिट घेण्यात आले आहे. त्यामुळे ग्रीड स्टेबिलिटी साठी नाशिकचा आणखी एक संच सुरू करण्याचे निर्देश देण्यात  आले आहेत. 

ऑक्टोबरमध्ये बारा तारखेला ग्रीड फेल झाल्याने मुंबईची बत्ती गुल झाली होती तेव्हा नाशिक औष्णिक वीज केंद्राचा एक संच सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.  नवसारी लाईनचे काम निघाल्याने आज मध्यरात्री पर्यंत संच क्रमांक तीन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा संच पंधरा नोव्हेंबर पर्यंत सुरू रहाणार आहे.

आजवर ज्या ज्यावेळी महानिर्मितीला वीज निर्मितीत अडचण आली आहे त्या त्या वेळी नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या कामगार अभियंता सह सर्व अधिकारी वर्गाने पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करून येथील चाळिशीतील संचांची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
सध्या राज्यातील वीजेची मागणी ही वाढती दिसून येत आहे. आज राज्याची वीजेची मागणी १९ हजार ६०० होती तर राज्याच्या सर्व स्रोतातून १३ हजार ५०० मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती . भविष्यात जर वीजेची मागणी जर आणखी दोन अडीच हजार मेगा वॅट ने वाढली तर येथील किमान २ संचांमधून वीज निर्मिती कायम सुरू राहील. व भविष्यात नाशिक औष्णिक वीज केंद्र बंद करण्याचा विचार सोडावा लागेल असेच चित्र दिसते.

पुर्ण क्षमतेने प्रकल्प सुरु व्हावा : आमदार सरोज अहिरे
यासंदर्भात आमदार सरोज अहिरे यांनी कळविले आहे, की गेल्या आठवड्यात मी उर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली होती. एकलहरे विद्युत प्रकल्पाला भेट द्यावी अशी विनंती त्यांना केली आहे. नाशिक पुणे मुंबई या सुवर्ण त्रिकोणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे .त्यामुळे येथील संच क्रमांक 3 सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उद्या (ता.९) पासून हा संच सुरू होणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी संच क्रमांक 5 सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरू व्हावा असा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रकल्पाला दीवाळी नंतर ऊर्जामंत्री भेट देणार आहेत.
...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख