नाशिकचा पुन्हा विसर...वीज प्रकल्पासाठी उरण वायू केंद्राचा विचार! - NSHIK NTPS Extension ignore Uran got sanction | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकचा पुन्हा विसर...वीज प्रकल्पासाठी उरण वायू केंद्राचा विचार!

नीलेश छाजेड
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

नुकतंच ग्रीड फेल होण्याने मुंबईवर जे संकट कोसळले होते, तसे भविष्यात होऊ नये याकरिता उरण येथे एक हजार मेगा वॅटचा वायू प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. नाशिकला सर्व सुविधा व तंत्रज्ञान असतांना नाशिकचा विचार झाला नाही. त्यामुळे नाशिककरांत अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

नाशिक : नुकतंच ग्रीड फेल होण्याने मुंबईवर जे संकट कोसळले होते, तसे भविष्यात होऊ नये याकरिता उरण येथे एक हजार मेगा वॅटचा वायू प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. नाशिकला सर्व सुविधा व तंत्रज्ञान असतांना नाशिकचा विचार झाला नाही. त्यामुळे नाशिककरांत अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

सोमवारी (ता. १२) कळवा - पडघा लाईनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मुंबईची बत्ती गुल झाली होती. त्यावर पर्याय काढण्यासाठी उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी उरण वायू केंद्र येथे एक हजार मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

एकलहरे येथील नाशिक औष्णिक वीज केंद्राकडे मुबलक जागा, रेल्वे, पाणी व राख साठवण बंधारा आदी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाचे नाशिक ते मुंबई मधील रेडीयल डिस्टन्स अवघे सव्वाशे किलोमीटर असताना नाशिक ते पडघा लाईन महत्वाची ठरू शकते. वीजेची उपलब्धता व तुटवडा याचा विचार न करता उरण किती संयुक्तिक ठरू शकते हाही अभ्यासाचा विषय आहे. मुंबईमध्ये जागांचे भाव गगनाला भिडलेले असतांना नाशिकला सर्व वीज निर्मीती संच निर्मितीसाठी तप्तर असल्याने ६६०×२ किंवा २५०×२ चा विचार होणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

तज्ञांनाही प्रश्न पडला
उरण प्रकल्पात आताही वीज निर्मिती वाढवता येऊ शकते. मात्र केंद्र सरकार गॅस उपलब्ध करुन देत नाही मुंबई उपनगरांत होत असलेल्या प्रदूषणामुळे या प्रकल्पाची निर्मिती क्षमता वाढविणे शक्य होणार नाह, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे ऊर्जामंत्र्यानी असा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न या क्षेत्रात तज्ज्ञांना पडला आहे.
....
राज्यात इतरत्र वीज प्रकल्पांना विरोध होत असताना, नाशिक येथे दहा वर्षांपासून बदली संचासाठी पाठपुरावा सुरू होता. असे असतांना उरण येथे प्रकल्पास मान्यता मिळते. त्यात नाशिकला डावलले जात आहे.
- चंद्रशेखर आहेर, सचिव, प्रकल्प बचाव संघर्ष समिती.

https://scontent.fnag4-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख