`मनसे`चे दातीर बनले दिलीपभाई `बीए` - Now MNS District president passed HSC Exam, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

`मनसे`चे दातीर बनले दिलीपभाई `बीए`

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

शिक्षण आणि राजकारण यांचा संबंध? याचे थेट उत्तर देण्यापेक्षा `नरो वा कुंजरो वा` असे मोघम दिलेले बरे. कोरण अल्प शिक्षण असतांना उत्तम कामे केलेले नेते आहेत. शिक्षीत मंडळी राजकारणात ढ निघालेली उदाहरणेही आहेत. मात्र येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांची शिक्षणाची आस फळाला आली आहे.

सिडको : शिक्षण आणि राजकारण यांचा संबंध? याचे थेट उत्तर देण्यापेक्षा `नरो वा कुंजरो वा` असे मोघम दिलेले बरे. कोरण अल्प शिक्षण असतांना (He done best work since less education)  उत्तम कामे केलेले नेते आहेत. शिक्षीत मंडळी राजकारणात ढ निघालेली उदाहरणेही आहेत. मात्र येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir) यांची शिक्षणाची आस फळाला आली आहे. राजकारणात पडल्यावर देखील त्यांनी अभ्यासाचा ध्यास न सोडता (He complets HSC Education) बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

राजकारणात असल्यावरही शिक्षण पूर्ण करणारे अनेक आहेत. कारण त्यांनी शिक्षणाची आस सोडलेली नव्हती. नाशिकच्या महापौर नयना घोलप या महापौर झाल्यावर त्यांनी पदवीची परिक्षा देऊन उत्तीर्ण झाल्या होत्या. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्या यादीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दातीर यांची भर पडली आहे.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी राज्यशास्त्र या विषयात पदवी संपादन करत स्वप्न पूर्ण केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. दिलीप दातीर यांनी राजकीय कारकीर्द सुरु ठेवत असताना जिद्द व मेहनतीने पदवीपर्यंतचे शिक्षणदेखील पूर्ण केले आहे. बुधवारी त्यांनr पदवी संपादन केल्याची आनंदाची बातमी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्यांनी केवळ पदवी पास केली नसून फस्ट क्लास विथ डस्टिंक्शन मिळविले आहे. ही बाब विशेष म्हणावी लागेल.

शपथ पूर्ण
दिलीप दातीर यांचा राजकारणात प्रवेश झाला त्यावेळी त्यांच्या एका राजकीय सहकार्याने त्यांचे शिक्षण विचारले. बारावी नापास असे सांगताच त्या सहकार्याने त्यांची चार चौघात ‘खिल्ली’ उडविली. त्यावेळी श्री. दातीर यांना अपमानित झाल्यासारखे वाटले. मग त्यांनी ठरवले की एक दिवस पदवी पूर्ण करणारच आणि ती शपथ त्यांनी पूर्ण करून दाखविली. ज्यांनी माझी खिल्ली उडवली आज ते मला गुरूसमान आहे, असे ते उदार मनाने सांगताना दिसतात. ही बाब विशेष म्हणावे लागेल.

घरामध्ये सात बहिणीच्या पाठीवर एकुलता एक असल्याने व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण अपूर्ण राहीले. राजकारणात प्रवेश केल्यानंतर पदवी पूर्ण करण्याचे ठरविले. जोमाने व चिकाटीने अभ्यास केला व यशस्वी झालो. यापुढे शिक्षण सुरूच ठेवणार आहे.
- दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष, मनसे. 
....

हेही वाचा...

धक्कादायक...नाशिकमध्ये चार महिन्यात नऊ हजार मृत्यु!
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख