आंदोलनाच्या नावाखाली कुणालाही रस्ते अडवू देणार नाही  - No road blocage for Agitation says CP Pandey | Politics Marathi News - Sarkarnama

आंदोलनाच्या नावाखाली कुणालाही रस्ते अडवू देणार नाही 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

रस्त्यावर पहिला हक्क पादचा-यांचा आहे. त्यात अडथळा येता कामा नये. त्यामुळे जर कोणी आंदोलनासाठी रस्ता अडवत असेल, तर त्यावर गंभीर कारवाई करु. आंदोलनाच्या नावाखाली कोणालाही रस्ते अडवू देणार नाही, असा इशारा  पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ऊठ सुठ आंदोलने करणा-यांना दिला आहे.

नाशिक : रस्त्यावर पहिला हक्क पादचा-यांचा आहे. त्यात अडथळा येता कामा नये. त्यामुळे जर कोणी आंदोलनासाठी रस्ता अडवत असेल, तर त्यावर गंभीर कारवाई करु. आंदोलनाच्या नावाखाली कोणालाही रस्ते अडवू देणार नाही, असा इशारा  पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ऊठ सुठ आंदोलने करणा-यांना दिला आहे.  

जिल्ह्यातील संपादक फोरममध्ये विविध संपादकांशी श्री. पांडे मंगळवारी संवाद साधला. यावेळी श्री. पांडे म्हणाले, समाज स्वास्थ्यासाठी पोलिस दल स्वस्थ असणे गरजेचे आहे. कोरोनालाटेत पोलिसदलाचा प्रमुख म्हणून माजी जबाबदारी होती, ही जबाबदारी यशस्वी झाल्याने आता पोलिस अवैध धंदे, गुन्हेगारांविरोधात बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज झाले आहे. 
श्री. पांडे म्हणाले, अवैध धंदे हा कायम पोलिसांच्या दिशेने बोट दाखविणारा विषय राहिला आहे. वास्तविक, ही सगळ्या विभागाची जबाबदारी असते. जे विभाग परवानग्या देतात, तेच त्यातील नियमभंगाबाबत जास्त अचूक कारवाई करू शकतात. त्यामुळेच अवैध धंद्याविरोधात कारवाईसाठी विविध विभागांचा एकत्रित फोरम केला आहे. त्याला सगळ्या विभागांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने दोन-दोन तास अभ्यास करायलाच हवा. हाच अवैध धंद्याविरोधात एकत्रित फोरमचा उद्देश आहे. यापुढे ज्या कारवाया होतील त्या कारवाया म्हणजे समूळ उच्चटनासाठी बिनटाक्याच्या शस्त्रक्रियाच ठरतील, असा दावा त्यांनी केला.

पोलिस आयुक्त पांडे यांनी नवा उपक्रम सुरु केला आहे. यासंदर्भात ते म्हणाले, दर शनिवारी प्रत्येक पोलिस ठाण्याला भेट देतानाच आजपासून रोज सांयकाळी एका पोलिस चौकीला सरप्राईज भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक शहर अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण शहर असून, येथील व्यवस्था भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात माध्यम आणि लोकसहभाग घेतला जाईल. 

रोज एका चौकीला भेट
नागरिकांच्या प्रत्येक अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क सामान्य नागरिकांचा असून, आंदोलनाच्या नावाखाली कुणालाही रस्ते अडविता येणार नाही. त्याविषयी मी सगळ्या राजकीय मंडळींना पूर्वकल्पना दिली आहे. रस्ते अडविल्यास कुणावरही कारवाई होईल. पोस्ट कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद आहे. शंभर टक्के रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता इतर आजार दूर करण्याचे प्रयत्न आहेत.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख