सुशांत सिंग आत्महत्येचा आदित्य ठाकरेंशी काडीमात्र संबंध नाही 

विरोधकांकडून सध्या प्रत्येक विषयाचे राजकारण केले जात आहे. यासंदर्भात अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येशी सातत्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध जोडण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न सुरु आहे.
सुशांत सिंग आत्महत्येचा आदित्य ठाकरेंशी काडीमात्र संबंध नाही 

नाशिक : विरोधकांकडून सध्या प्रत्येक विषयाचे राजकारण केले जात आहे. यासंदर्भात अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येशी सातत्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध जोडण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न सुरु आहे. यावर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप करणारांचा समाचार घेतला आहे. `अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा आदित्य ठाकरेंशी काडीचाही संबंध नाही` असे त्यांनी सांगितले.  

सुशांत सिंग प्रकरण माध्यमांत सातत्याने चर्चेत आहे. यामध्ये महाराष्ट्र विरुद्ध बिहार या दोन राज्यात ओढाताण सुरु आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते या प्रकरणाची `सीबीआय` चौकशीची मागणी करीत आहेत. भाजपचे नेते या प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवते आहे, असे सांगत अप्रत्यक्षरित्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत, राजकारण तापवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.  

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक प्रसंगी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर सुशांत सिंग आत्महत्येचा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नसल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे ज्येष्ठ मंत्री असलेल्या भुजबळ यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र असल्याने त्याला महत्व दिले जात आहे. 

यासंदर्भात पार्थ अजित पवार यांच्या विधान तसेच त्यावरुन माध्यमांत पवार कुटुंबियांविषयी रंगलेल्या चर्चेबाबत श्री भुजबळ म्हणाले, शरद पवार हे आमचे सगळ्यांचे कुटुंब प्रमुख असल्याने कोणी चुकत असेल तर त्याचा कान पकडण्याचा अधिकार पवारांना आहे. पवार कुटुंबात कोणताही वाद नाही असं सांगत भुजबळांनी या विषयावर पडदा टाकला.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2178-6/10956900_1564320000510960_367110831_n.png?_nc_cat=103&_nc_sid=5ca315&_nc_ohc=hujcUQJzF-UAX_wwLxZ&_nc_ht=scontent.fpnq1-1.fna&oh=5a838a676eb0dffef61b74c30bc80940&oe=5F5ED798

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com