महापालिकेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सीजन गळतीने धावपळ - NMC Zakir Hussain covid Hospital o2 Tank leak. Patients shifted, Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महापालिकेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सीजन गळतीने धावपळ

संपत देवगिरे
बुधवार, 21 एप्रिल 2021

महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन या सध्या कोविच्या रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालयात ऑक्सीजनच्या नव्या टाकीला गळती लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून येथील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले आहे. 

नाशिक : महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन या सध्या कोविच्या रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालयात ऑक्सीजनच्या नव्या टाकीला गळती लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून येथील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले आहे. 

आज सकाळी अकराला गॅस रिफीलींग करताना हा प्रकार घडला. येथे शंभऱहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी येथे नव्याने एक किलो लिटरचा (एक टन) क्षमतेचा सिलेंटर बसविण्यात आला होता. आज सकाळी त्यात फिलींग करतांना गॅस गळती झाली. त्यामुळे धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून येथील डॅाक्टर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विविध रुग्णवाहिकांतून रुग्ण हलविण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. गळतीचे कारण व नेमकी त्रुटी स्पष्ट झालेली नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख