नाशिक महापालिकेने लसीसाठी ग्लोबोल निविदा काढाव्या !

केंद्र सरकारचो धोरण व लस मिळण्यासाठी नागिरकांची होणारी ससेहेलपट अतिशय त्रासदायक आहे. नाशिककरांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने तातडीने स्मार्ट सिटीची कामे थांबवावीत. नाशिककरांसाठी लागणारी लस महापालिकेने स्वतः ग्लोबोल निविदा काढून खरेदी कराव्यात.
Hemlata Patil
Hemlata Patil

नाशिक  : केंद्र सरकारचो धोरण व लस मिळण्यासाठी नागिरकांची होणारी ससेहेलपट अतिशय (Centre Government policy on vaccination is not usefull)  त्रासदायक आहे. नाशिककरांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने तातडीने स्मार्ट सिटीची कामे (Stop Smart city Works in Nashik & Call Globol tender for Vaccine) थांबवावीत. नाशिककरांसाठी लागणारी लस महापालिकेने स्वतः ग्लोबोल निविदा काढून खरेदी कराव्यात, अशी सूचना महापालिकेतील कॅांग्रेसच्या गटनेत्या डॅा. हेमलता पाटील (Dr Hemlata Patil) यांनी केली आहे. 

त्या म्हणाल्या, सध्या पुर्ण देशामध्ये लसींचा अभुतपुर्व तुटवडा निर्माण झाला आहे. आपली लसिकरणाची टक्केवारी केवळ १.८ % आहे. याच गतीने देशात लसिकरण सुरू राहीले तर आपणास संपुर्ण देशाचे लसिकरण होण्यास २०२५ साल उजाडेल. सिरम आणि बायोटेक या लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी देखील महाराष्ट्र सरकारला मुदतीमध्ये लसी उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शवली आहे. सद्यस्थितीमध्ये करोना पासुन बचाव करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय समोर आहे.  या सगळ्या बाबींचा विचार करता नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या सर्व कामांना फुली मारावी. 

मुंबई महापालिकेप्रमाणे नाशिक शहरासाठी लागणाऱ्या लसी या ग्लोबोल स्तरावर निविदा काढून खरेदी कराव्यात. प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात लसिकरण मोहीम राबवावी. त्यामुळे भविष्यात उत्पन्न होणारी तिसरी लाट, म्युकरमायोसीस सारखे गंभिर आजार यांना थोपवीता येईल. पर्यायाने नागरिकांची जिवीत आणि वित्तहानी होण्यापासुन सुटका होईल. शहरातील करोनाची दहशत संपेल. सर्व यंत्रणांवर पडलेला अतिरीक्त ताण कमी होण्यास मदत होईल.

नाशिक शहरात सध्या लसीकरणाचा जो कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे, त्यात शाश्त्रोक्त विचार व नियोजन झालेले दिसत नाही. कोव्हॅक्सीन व कोशील्ड या दोन्ही लस देण्याची जी केद्र आहेत, तीथे अगदी सकाळपासून नागरिक गर्दी करतात. या गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्ग काळात धोके संभवू शकतात. याबाबत लस घेण्यासाठी येणाऱ्यांना मास्क, सामाजिक अंतर, लस कशी मिळेल याची पारदर्शी व्यवस्था याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन केले गेले पाहिजे. वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांवर लस देण्यासाठी गर्दीमुळे मोठा दबाव आहे. त्यातून त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. याबाबत लसीकरण प्राधान्याचा विषय समजुन त्याचे नियोजन व कार्यवाही करावी, असे नगरसेविका डॅा पाटील म्हणाल्या.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com