कोरोनामुळे नाशिकमध्ये घरातच राहूनच मोहर्रमचा दुखवटा !  - NMC says stay at home in Moharram | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुळे नाशिकमध्ये घरातच राहूनच मोहर्रमचा दुखवटा ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

करोनामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सार्वजनिक स्वरुप टाळावे. घरात राहूनच साध्या पद्धतीने मोहर्रम पाळावा. कोरोनासाठी रक्तदान शिबिरे, प्लाझ्मा शिबिरांसारखे उपक्रम करावेत. 

नाशिक : करोनामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सार्वजनिक स्वरुप टाळावे. घरात राहूनच साध्या पद्धतीने मोहर्रम पाळावा. कोरोनासाठी रक्तदान शिबिरे, प्लाझ्मा शिबिरांसारखे उपक्रम करावेत असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. 

यासंदर्भात महापालिकेने पत्रक काढले आहे. शासनाचे सर्व नियम व सूचनांचे पालन करुन यंदा साध्या पद्धतीने मोहर्रम करावा. यानिमित्ताने ताजीयाची मिरवणूक काढण्यास परवानगी दिली जाणार नाही. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मंडपाची परवानगी ऑनलाईन दिली जाईल. मात्र कोणत्याही स्थितीत चार पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तशी परवानगी नाही. यानिमित्ताने नागरिकांत जनजागृती करण्याती यावी. घराशेजारीच ताजीया बसवून त्याचे घराशेजारीच विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे. कोविड काळात पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमांप्रमाणेच मोहर्रम देखील आपापल्या घरात राहुनच दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य सरकारकडून त्यासाठी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे हा सण देखील घरीच होणार आहे. 

सध्या जिल्ह्यातील पंचवीस  हजार ३४१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत चार हजार ९१८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णामध्ये किंचीत घट झाली आहे.  आत्तापर्यंत जिल्ह्यात ७९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण असे, नाशिक २७२, चांदवड २९ , सिन्नर २११, दिंडोरी ४६, निफाड २६५, देवळा ४९,  नांदगांव ११३, येवला ४६, त्र्यंबकेश्वर १३, सुरगाणा ००, पेठ ०२, कळवण १३,  बागलाण १४३, इगतपुरी ८४, मालेगांव ग्रामीण १६८ असे एकूण  १हजार ४५४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. नाशिक  महापालिका क्षेत्रात दोन हजार ७८७, मालेगांव महापालिका क्षेत्रात ६६८  तर जिल्ह्याबाहेरील ९ असे चार हजार ९१८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  एकतीस  हजार ०५९  रुग्ण आढळून आले आहेत.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख