50 कोटींच्या खैरातीमुळे नगरसेवकांना सबसे अच्छे दिन! - NMC praposed 50 Cr Fund for Corporator, Nashik Politicds | Politics Marathi News - Sarkarnama

50 कोटींच्या खैरातीमुळे नगरसेवकांना सबसे अच्छे दिन!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

महापालिकेने आज अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये १०.५० लाख नगरसेवक निधी व 30 लाखांचा प्रभाग विकास असा ४०.५० लाखांचा निधी मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रभागासाठी सरासरी 5 कोटींची तरतूद करण्यात आली.

नाशिक : महापालिकेने आज अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये १०.५० लाख नगरसेवक निधी व 30 लाखांचा प्रभाग विकास असा ४०.५० लाखांचा निधी मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रभागासाठी सरासरी 5 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे आगामी वर्षातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांना सबसे अच्छे दिन आले आहेत. 

कोरोनामुळे गेल्या वर्षी महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली. नागरिकांवर देखील आर्थिक तणाव आहे, याचा ताळमेळ राखत प्रशासनाने आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी दोन हजार ३६१ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. कुठलीही करवाढ न करता पर्यावरण, स्मार्ट शाळा व गोदावरी स्वच्छतेसाठी भरघोस निधीची घोषणा करुन निवडणुक वर्ष असल्याने नगरसेवकांना विकासकामांसाठी सढळ हाताने निधीची तरतूद त्यात आहे. 

स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्त कैलास जाधव यांनी अंदाजपत्रक सादर केले. कोरोनामुळे आर्थिक वर्षात ३५३ कोटींनी उत्पन्न घटले. आगामी वर्षात नव्या जोमाने पुन्हा उभारी देण्याचा निश्‍चय अंदाजपत्रकातून दिसून आला. उत्पन्नात जीएसटी व एलबीटी अनुदान, मुद्रांक शुल्कातून ११४७.०८ कोटी रुपये, मालमत्ता करातून १७०.७३ कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. शासनाने नवीन युनिफाईड डिसीपीआर मंजुर केला. प्रिमिअम एफएसआय, बांधकाम शुल्क, अतिरिक्त क्षेत्र निर्देशांकाच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध झाला. त्या माध्यमातून ४५३.०८ कोटी रुपये महसुलाचा अंदाज आहे. पाणीपट्टीतून ७५ कोटी, जाहीरात व परवान्यातून साडे सहा कोटी असे एकुण १८५२.३९ कोटी रुपये उत्पन्न वर्षभरात प्राप्त होईल. रस्ते विकासासाठी २१० कोटी, ईमारत बांधण्यासाठी पंधरा कोटी, पुल व सांडवे बांधकामासाठी अठरा कोटी, स्मशानभुमी सुधारणे साठी आठ कोटी, व्यावसायिक मार्केट उभारण्यासाठी पाच कोटी, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी १२७ कोटी रुपये, मलनिस्सारण व्यवस्थापनासाठी ११८. ४८ कोटी, विद्युत व्यवस्थेसाठी २५.७४ कोटी, कार्यशाळा व्यवस्थापन १५ कोटी, माहिती व तंत्रज्ञानासाठी ५.६५ कोटी, गोदावरी संवर्धनाकरीता ३६.१६ कोटी, शिक्षण विभागाकरीता १३३.४५ कोटी, सार्वजनिक स्वच्छतेसाठी १०४.०७ कोटी, सार्वजनिक आरोग्याकरीता ८२.८६ कोटी, पशुवैद्यकीय सेवेसाठी ५.२६ कोटी, उद्यान विकासासाठी २३.१४ कोटी, अग्निशमनकरीता ५५ लाख, अतिक्रमण निर्मूलन दोन लाख रुपये, सिडकोत जलतरण तलावासाठी १.४५ कोटी, सातपूर मध्ये मार्केटकरीता पाच कोटी, दफनभुमी

दफनभुमी सुधारणा
अल्पसंख्याक समाजाच्या दफनभुमीची सुधारणा व नुतनीकरणासाठी ८ कोटी, दिव्यांगांकरीता मनपा हद्ीत शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र उभारण्यासाठी १५.५७ कोटी, आरटीपीसीआर लॅबसाठी ४ कोटी, चुंचाळे येथील आरक्षित जागेत वनउद्यान, मागासवर्गीय कल्याणासाठी ५ टक्के, महिला बाल कल्याणासाठी ५ कोटी, दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के व क्रीडा धोरणासाठी ५ टक्के अशी समाजकल्याण विभागासाठी २० टक्के तरतूद करण्यात आली आहे.

ड्रीम प्रोजेक्टकरीता १०२ कोटी
परिवहन सेवेसाठी च्या ड्रीम प्रोजेक्टकरीता १०२ कोटी, दिल्लीच्या धर्तीवर गोरगरीबांसाठी झोपडपट्टी परिसरात १० मोहल्ला क्लिनिक, वैद्यकीय सेवा जलद उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर एका प्रसुतिगृहात ई-हॉस्पीटल मॅनेजमेंट सिस्टीम, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र, गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदुषणमुक्तीसाठी सर्वेक्षण, स्मार्ट स्कूल, त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील उड्डाणपुल, गंगापूरला नाट्यगृह, सिडकोत महिलांसाठी जलतरण तलाव आदींसाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख