पंतप्रधान मोदींना पत्र; महापालिकेत दरमहा १.८५ कोटींचा घोटाळा? - NMC Contract labour salary Scham 1.85 cr...Leter to PM | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींना पत्र; महापालिकेत दरमहा १.८५ कोटींचा घोटाळा?

संपत देवगिरे
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

महापालिकेच्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे. त्यांच्या पगारातून कंत्राटदार दरमहा १.८५ कोटींची लूट होते, असा आरोप नगरसेविका हेमलता पाटील यांनी केला. त्यावर कारवाईसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्र लिहिले आहे. 
 

नाशिक : महापालिकेच्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने कंत्राटी सफाई कामगारांच्या वेतनात अपहार होत आहे. त्यांच्या पगारातून कंत्राटदार दरमहा १.८५ कोटींची लूट करतात असा आरोप कॅाग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस, गटनेत्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. 

महापालिकेतील घोटाळ्याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिन्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पाटील यांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांच्या वेतना घोळ करुन कंत्राटदार परस्पर पैशांचा अपहार करीत आहे. त्यात प्रशासन देखील सहभागी असल्याचा संशय आहे. त्यामुळे याबाबत गंभीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  

नगरसेविका पाटील म्हणाल्या, नाशिक शहरातील नागरिक सध्याच्या भ्रष्टाचामुळे खुप नाराज आहेत. मात्र यामध्ये प्रशासन आणि अधिकारी दोघांनी या गैरव्यावहारात आपले हात धुऊन घेतले आहेत. या सर्व कर्मचारी वर्गाचे पंजाब नॅशनल बॅंकेत खाते उघडले आहे. त्या खात्याचे चेक बुक कंत्राटदाराला सोपविण्यात आले आहे. वस्तुतः हे चेक बुक कामगारांच्या खात्याचे असल्याने कामगारांकडे असेल पाहिजे. नियमानुसार या कामगारांच्या खात्यात दरमहा सत्तावीस हजार रुपये जमा होने अपेक्षित आहे. कंत्राटदार तेव्हढे पैसे जमा करतो. मात्र त्याच्याकडे कामगारांचे चेक बुक असल्याने ते त्यातून पैसे काढून घेतात. कामगारांना केवळ अकरा हजार पाचशे रुपये दिले जातात. थोडक्यात कंत्राटदार सातशे कामगारांचे व महापालिकेचे दरमहा एक कोटी पंच्यांएैंशी लाख रुपये हडप करतो. ही उघड लुट सुरु आहे. हा पैसा सामान्य नागरिकांच्या खीशातून जातो आहे. ही अ्तयंत खेदाची बाब आहे. नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या विरोधात कोणीही आवाज उठवत नाही. कोणावरही कारवाई होत नाही. याचा अर्थ हे सर्व घटक त्यात सहभागी असल्याचा संशय येतो. 

श्रीमती पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की महापालिकेच्या भ्रष्टाचाविषयी आपल्याला सांगने निश्चितच योग्य नाही. मात्र हा गंभीर विषय असल्याने याबाबत आपल्याला कळविले जात आहे. या विषयात आपण जरुर लक्ष घातले पाहिजे. शहरात स्मार्ट सिटी ही आपली विशेष रुची असलेली योजना सुरु आहे. त्यात देखील असाच गोंधळ सुरु आहे. यासंदर्भात आपण दोन ओळीचे पत्र लिहिले तरीही या भ्रष्ट लोकांना वचक बसेल.     
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख