नाशिकला कोव्हीड सेंटरसह रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था  - NMC Com. all the information of Oxygen facilities | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकला कोव्हीड सेंटरसह रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोव्हीड सेंटर मध्ये खाटांची संख्या वाढविली जात आहे. त्याचबरोबर आता रुग्णवाहिका व कोव्हीड सेंटर मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोव्हीड सेंटर मध्ये खाटांची संख्या वाढविली जात आहे. त्याचबरोबर आता रुग्णवाहिका व कोव्हीड सेंटर मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सस्रव रुग्णालयांची माहिती सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन हाय ॲलर्ट मोडमध्ये आहे.

एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतं गेली. ऑगष्ट महिन्यात कोरोनाने उच्चांक पातळी गाठली. वीस हजारांच्या पार आकडा गेला आहे. शासनाच्या एका अहवालानुसार कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने कोव्हीड सेंटरची संख्या वाढविताना सध्या सुरु असलेल्या सेंटर मध्ये बेड वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनची माहिती घेतली जात आहे.  आतापर्यंत किती ऑक्सिजन वापरला गेला. सद्यस्थितीत किती साठा उपलब्ध आहे.  भविष्यात किती प्रमाणात गरज पडेल याची माहिती मागविण्यात आली आहे. 

दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील चोविस हजार ६९८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत चार हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात यावा यासाठी सर्व यंत्रणा सक्रीय आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णांची संख्या अशी, नाशिक २७३, चांदवड २८, सिन्नर २१५, दिंडोरी ५१, निफाड २७०, देवळा ४४,  नांदगांव ११३, येवला ४१, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०६, पेठ ०२, कळवण १३,  बागलाण १४३, इगतपुरी ११७, मालेगांव ग्रामीण २०३ असे एक हजार ५४१  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार ७१२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६९३ आणि जिल्ह्याबाहेरील ९ असे चार हजार ९५५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  ३०  हजार ४३८  रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७६.८३,  टक्के, नाशिक शहरात ८४.५० टक्के, मालेगाव मध्ये  ६५.३२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८१.१४ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात २१५, नाशिक शहरात ४४२, मालेगांव शहरात १०६ व जिल्हा बाहेरील २२ अशा  ७८५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख