मौल्यवान निर्णय...निशिगंधा मोगलांनी २० लाखांचे सोने सैनिकांसाठी दिले !  - Nishigandh Mogal given 20 lacs to Indian Army | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मौल्यवान निर्णय...निशिगंधा मोगलांनी २० लाखांचे सोने सैनिकांसाठी दिले ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी स्त्रीयांतील या पारंपारीकतेला मागे टाकत सोन्याहून अधिक मौल्यवान निर्णय घेतला. त्यांनी आपले वीस लाखांचे सोने चक्क भारतीय सैन्याला दान केले आहे.

नाशिक : सोने मौल्यवान आहे. त्यात स्त्रीयांसाठी तर सर्वात प्रिय अन् मौल्यवान देखील. महिला जीवापाड जपतात अन् मिरवतात ते देखील सोने. मात्र भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी स्त्रीयांतील या पारंपारीकतेला मागे टाकत सोन्याहून अधिक मौल्यवान निर्णय घेतला. त्यांनी आपले वीस लाखांचे सोने चक्क भारतीय सैन्याला दान केले आहे. 

जगातील सर्व चलनांची तुलना सोन्याच्या किंमतीशी केली जाते, त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात. सोन्यात जीव गुंतला नाही, अशा खुप कमी महिला असतील. तसे निशिगंधा मोगल देखील एक स्त्रीच आहे. त्यामुळे त्यांना सोने प्रिय नसेल, असे म्हणता येणार नाही. त्यांनीही आयुष्यभर जमेल तसे सोन्याची दागीने केलेच. मात्र एका प्रगल्भतेच्या वळणावर त्यांना सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान विचार सुचला. त्याला कुटुंबियांनी देखील मान्यता दिली. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वीस लाखांचे सोने अर्थात स्त्रीधन भारतीय सैन्यासाठी देण्याचे ठरविले. त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. मात्र सैनिक कल्याण मंडळ सोने किंवा तत्सम वस्तू स्विकारत नाही, असे त्यांना कळविण्यात आले. मग त्यांनी हे सोने सराफाकडे दिले. त्याचे मुल्य वीस लाख रुपये होते. हे वीस लाख रुपये त्यांनी भारतीय सैन्यासाठी दिले. हा निर्णय महिलांसाठी सहज सोपा नाही, तसा सर्व समान्य महिलेला पचनी पडणारा देखील नसावा. मात्र निशिगंधा मोगल यांनी ही वेगळे वाट निवडून आपले वेगळेपण ठसवले आहे. 

माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी सैनिकांप्रति प्रेम दाखवत स्वतःचे दागिने मोडून २० लाखांचा जमविलेला निधी ध्वजनिधी म्हणून सैनिक कल्याण मंडळाकडे सुपूर्द केला. त्यांच्या या सैनिकीप्रेमाचे नाशिककरांकडून कौतुक होत आहे. देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांची सुरक्षा करणे प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याची भावना श्रीमती मोगल यांनी या वेळी व्यक्त केली. 

सौ. मोगल या महाराष्ट्रात शिवसेना, भाजप युतीचे सरकार असतांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य होत्या. त्या १९८० पासून भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचे पती राजाभाऊ मोगल हे वास्तू विशारद असुन राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. सरसंघचालकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. शंकराचार्य न्याससह विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख