अतिवृष्टीची भरपाई दिवाळीपूर्वीच द्यावी 

खरिप हंगामात परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागात शेतीचे मोठे नुकसान केले. नाशिक जिल्ह्यातील भात, कांदा तसेच भाजीपाल्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीची भरपाई दिवाळीपूर्वीच द्यावी 

नाशिक : खरिप हंगामात परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागात शेतीचे मोठे नुकसान केले. नाशिक जिल्ह्यातील भात, कांदा तसेच भाजीपाल्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना राज्य शासनाने दिवाळीपूर्वी भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार निर्मला गावित यांनी केली आहे. 

यासंदर्भात माजी आमदार गावित यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. गेल्या आठवड्यापासून सातत्याने परतीच्या पावसाने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसराला झोडपून काढले आहे. विशेषतः इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघात भात पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पीक काढणीच्या अवस्थेत होता. अनेक भागात भात कापणी करुन शेतात साठवलेला होता. परतीच्या पावसाने या पिकांची हानी झाली. मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन श्रीमती गावित यांनी शेतकरी, आपत्तीग्रस्तांशी चर्चा केली. भात, भाजीपाला, कांदा तसेच अन्य विविध पिकांना हानी पोहोचली आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला देखील पावसाने दगा दिल्याने भातासह अन्य पिकांची हानी झाली होती. त्याचा विचार करुन शासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे. मात्र त्याला नेहेमीसारखी शासकीय कामकाजाची पद्धत अवलंबू नये. वेगाने काम करुन शेतीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळेल. 

यासंदर्भात माजी आमदार निर्मला गावित गेली तीन- चार  दिवसांपासून मतदारसंघात पाहणी दौरा करीत आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या भागातील विविध शेतकरी, कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देऊन चर्चा केली.
...     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com